Smart City Project : स्मार्ट सिटी गुंडाळली, प्रकल्प महापालिकेकडे होणार हस्तांतरित

केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर २०१६ मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. आता हा प्रकल्प आठ वर्षानंतर बंद करण्यात येत आहे.
Smart-City
Smart-CitySakal

पुणे - केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर २०१६ मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. आता हा प्रकल्प आठ वर्षानंतर बंद करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडकडील विविध १४ प्रकल्प पुढील २० दिवसात महापालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहेत. दरम्यान, स्मार्ट सिटीतर्फे संपूर्ण शहरात गेल्या आठ वर्षात ११४८ कोटी रुपयांचे ४५ प्रकल्प राबविण्यात आले आहेत.

पुणे महापालिकेत आज आयुक्त विक्रम कुमार, स्मार्ट स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजीव कोलते यांच्या सह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. २०१६ पासून स्मार्ट सिटीने ॲमेनिटी स्पेसच्या जागेवर विविध प्रकल्प राबविले आहेत. स्मार्ट सिटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार एकूण ४५ प्रकल्प करण्यात आले आहेत.

त्यातील काही प्रकल्प यापूर्वीच महापालिकेला हस्तांतरित करण्यात आले आहेत. आता पुढील २० दिवसात १४ प्रकल्प हस्तांतरित केले जातील. तर आयटीएमएस, हेल्थ मॅनेजमेंट सिस्टीम, डिजिटल स्कूल एज्युकेशन सिस्टीम असे प्रकल्प अजून पूर्ण झालेले नाहीत. यांचे काम जानेवारी अखेर पर्यंत पूर्ण केले जाणार आहेत.

बाणेर बालेवाडी स्मार्ट सिटी

केंद्र सरकारने २०१६ मध्ये स्मार्ट सिटी योजना जाहीर करण्यापूर्वी देश पातळीवर स्पर्धा घेऊन १०० शहरांची निवड केली होती, त्यामध्ये पुण्याचा दुसरा क्रमांक आला होता. या योजनेचे उद्‍घाटनही पुण्यातच झाले होते. स्मार्ट सिटीकडून एरिया डेव्हलपमेंट अंतर्गत बाणेर-बालेवाडी भागाची निवड करण्यात आली होती. त्यामुळे हा भाग कायमच स्मार्ट सिटी म्हणून ओळखला जातो.

या भागातील सुमारे तीन चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात अनेक प्रकल्प उभारण्यात आले. तर सिंहगड रस्त्यावरील कमांड आणि कंट्रोल सेंटर, वाहतूक नियोजनासाठी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा तसेच काही उद्याने असे प्रकल्प शहराच्या इतर भागात करण्यात आले. स्मार्ट सिटीकडून यापूर्वीच उद्याने, जलतरण तलाव, नागरी सुविधा असे प्रकल्प यापूर्वी हस्तांतरित केले आहेत.

आणखी ५८ कोटीची गरज

स्मार्ट सिटीला शासनाकडून मिळालेल्या रकमेवर ५८ कोटी रुपये व्याज मिळाले होते. पण हे व्याज शासनाने स्मार्ट सिटीला न देता स्वतःकडे जमा करून घेतले आहे. त्याचा फटका स्मार्ट सिटीच्या काही प्रकल्पांना बसला आहे. ही रक्कम महापालिकेने द्यावी अशी मागणी स्मार्ट सिटीने केली होती, पण महापालिकेने त्यास नकार दिल्याने आता शासनाच्या नगरविकास खात्याकडे पैशाची मागणी करण्यात आली आहे.

हे १४ प्रकल्प हस्तांतरित होणार

  • कम्युनिटी फार्मिंग

  • बुक झेनिया

  • स्मार्ट फार्मिंग मार्केट

  • सायन्स पार्क

  • सीनियर सिटिझन पार्क,

  • फिटनेस ॲण्ड रिझ्युनिशेन

  • एव्हायरमेंट पार्क

  • पार्क फॉर स्पेशल एबलड्

  • रिन्यूव गार्डन

  • एनर्जाइज गार्डन,

  • डिफेन्स थीम

  • वॉटर कॉन्झर्वेशन

  • ओपन गार्डन

  • रियालिटी पार्क

‘स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांसोबत आज बैठक झाली. त्यांचे १४ प्रकल्प महापालिकेला हस्तांतरित केले जाणार आहेत. त्यानंतर महापालिकेतर्फे हे प्रकल्प, उपक्रम राबविले जातील.’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com