औंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते या पद्धतीने विकसित होणार आहेत. 

पुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते या पद्धतीने विकसित होणार आहेत. 

औंधमध्ये डीपी रस्त्यावर दोन-अडीच मीटरचे पदपथ होते. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले होते. या पार्श्‍वभूमीवर स्मार्ट सिटी कंपनीने हा रस्ता मॉडेल रस्ता तयार करण्याचे ठरविले. त्यानुसार मार्च २०१७ मध्ये त्याचे काम सुरू झाले. पदपथांची रुंदी वाढवून ४ ते ६ मीटर केली. या रस्त्यावरील वृक्षसंपदाही कायम ठेवली. अपंगांनाही हा पदपथ सहज वापरता येईल, अशी त्याची रचना केली आहे. त्यामुळे व्हीलचेअरचा वापर करणारे नागरिकही या पदपथाचा वापर करू लागले आहेत. पुढच्या टप्प्यात स्मार्ट बस स्टॉप आणि स्मार्ट टॉयलेट उभारणार आहे. त्याचा आराखडा निश्‍चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आर्किटेक्‍ट व अर्बन डिझायनर प्रसन्न देसाई यांनी या रस्त्याचा आराखडा तयार केला आहे. या रस्त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने १८ कोटी रुपये खर्च केले आहेत. 

या शहरांत  स्मार्ट स्ट्रीट
औंधमधील मॉडेल रस्त्याचे अनुकरण देशातील कोइमतूर, वाराणसी, धरमशाला, चेन्नई, काकीनाडा, अजमेर, उदयपूर, रायपूर, नाशिक, औरंगाबाद आणि पिंपरी-चिंचवडमध्ये झाले आहे. तेथील अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून आराखड्यानुसार त्यांच्या-त्यांच्या शहरात असा पदपथ तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Web Title: Smart Street arrived in Aundh