युवकांच्या दक्षतेने सर्पगरुडाचे वाचले प्राण 

junnar.
junnar.

जुन्नर -  आर्वी ता.जुन्नर येथे जाळ्यात अडकलेल्या जखमी अवस्थेतील सर्पगरुडाचा जीव वाचविण्यात यश आले आहे. 

मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाळीत हा पक्षी अडकला होता. अतिशय चतुर व तुरळक आढळणारा सुमारे पाच किलो वजनाचा हा पक्षी असून, तो उंच आकाशातून भक्षाचे अचूक निरीक्षण करून क्षणात झेप घेत भक्षाची पकडून शिकार करतो. 

शिकारीच्या प्रयत्नात तो जाळ्यात अडकला व जखमी झाला असल्याची शक्यता वनरक्षक रमेश खरमाळे यांनी व्यक्त केली. आर्वी येथील तरुणांनी रविवारी सायंकाळी खरमाळे यांना ही घटना कळविली. त्यांनी जाळ्यात अडकलेल्या पक्षाची सुरक्षित सुटका करून त्यास अधिक उपचारासाठी बिबट निवारण केंद्र, माणिकडोह येथे वनरक्षक संजय गायकवाड व आदर्श जगताप यांच्या मदतीने पोहचविले. आर्वीचे तरुण मोहन ड़ोंगरे, ओंकार सरवदे, अभिषेक डोंगरे, महेश ड़ोंगरे, विशाल चव्हाण, प्रशांत बो-हाडे यांनी जागरूकता दाखविल्याने या निसर्ग रक्षकाचे प्राण वाचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com