बिबवेवाडीत स्वच्छतागृहात सापांची दहशत

snake.jpg
snake.jpg

बिबवेवाडी : एरव्ही साप समोर आला तर नागरिकांची भंबेरी उडते परंतु सकाळच्या वेळी स्वच्छतागृहात गेल्यावर स्वछतागृहात साप समोर वेटोळे घालून बसलेला दिसल्यावर माणसाची काय अवस्था होईल, परंतु गेल्या काही दिवसांपासून बिबवेवाडी गावठाणातील नागरीक असा अनुभव घेत असून, त्यामुळे स्वछतागृहत जायला नागरीक घाबरत असून महिलांची कुचंबणा होत आहे.

गावठाणात तीन ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह असून, वरची आळी व कीटक प्रतिबंधक कोठी मागील स्वच्छतागृहत मागील काही दिवसांपासून साप दिसत आहेत. सकाळी, दुपारी रात्रीच्या वेळी सापाचा वावर दिसत असल्याने नागरिक घाबरत असून त्यामुळे आरोग्यकोठी शेजारील स्वच्छतागृहात गर्दी होत आहे.

कोरोनाचे गावठाणात अनेक रूग्ण आढळून आले होते, त्यात सापांच्या भितीने नागतरिक एकाच स्वच्छतागृहात गर्दी करत असल्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीती असून, साप पकडण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकार्यांशी बोलणे झाल्याचे नागरिकांनी सांगितले. स्वच्छतागृहात साप निघत असल्याचे वरिष्ठांना कळविले असल्याचे आरोग्य निरीक्षक सचिन पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com