विक्रीसाठी आणलेले चार लाखांचे मांडूळ जप्त; दोघांना अटक

crime_logo
crime_logo

पिंपरी (पुणे) - विक्रीसाठी आणलेले चार लाख रुपये किमतीचे मांडूळ एमआयडीसी भोसरी पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पुणे-नाशिक रोडवर मोशी येथे केली. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

हेमंत संजू पवार (रा. शिवाजीनगर), आकाश बापू वाघमारे (रा. बीटी कवडे रोड, भीमनगर, झोपडपट्टी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अभय महादेव भवारी (वय 38, रा. किरकीटवाडी, खडकवासला) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नाशिक रोडवर मोशी येथे काळजे पेट्रोल पंपाजवळ दोन व्यक्ती मांडूळ विक्रीसाठी आल्याचे एमआयडीसी भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तीन फूट लांब आणि अडीच किलो वजन असलेले एक मांडूळ आढळून आले. यावरून दोघांना अटक करून प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com