Pune: Married Woman Ends Life After Alleged Threat from Husband on RakhiEsakal
पुणे
Pune : रक्षाबंधनाला भाऊ रिकामा आला तर जीवे मारू, नवऱ्याच्या धमकीनंतर २७ वर्षीय विवाहितेनं संपवलं आयुष्य
Sneha Zendge Death Case : रक्षाबंधनला भाऊ रिकाम्या हाताने आला तर जीवे मारून टाकू अशी धमकी विवाहितेला देण्यात आली होती. या धमकीनंतर विवाहितेनं गळफास घेत राहत्या घरीच आत्महत्या केल्याची घटना घडलीय.
पुण्यात आणखी एक हुंडाबळीची घटना घडली असून एका २७ वर्षीय विवाहितेनं गळफास घेत आत्महत्या केलीय. रक्षाबंधनला भाऊ रिकाम्या हाताने आला तर जीवे मारून टाकू अशी धमकी विवाहितेला देण्यात आली होती. स्नेहा विशाल झेंडगे असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचं नाव आहे. या प्रकरणी महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या लोकांविरोदात तक्रार दाखल केली आहे.

