सावधान ! तर तुमची नोकरीही जाईल आणि परदेशवारी करता येणार नाही !

So your job will go away and no foreign trip can do it
So your job will go away and no foreign trip can do it
Updated on

पुणे : तुम्हाला परदेशात जायचेय? चांगली नोकरी करायची आहे? अशी आयुष्यात येणारी कुठलीच सुवर्णसंधी तुम्हाला गमवायची नाही ना ? तर मग नववर्षाचे स्वागत करताना उत्साहाच्या, आनंदाच्या भरात मद्यपान करू नका, अन्यथा तुम्ही वाहतूक पोलिसांच्या "ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह' कारवाईमध्ये अडकला आणि पुढे तुमच्या संधी कायमच्या हिरावल्या जाऊ शकतात. शहरात 130 हून अधिक ठिकाणांवर मद्यपी वाहनचालकांची चाचणी घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नववर्षाचे स्वागत करताना तरुणाईकडून मद्यप्राशन केले जाते. त्यानंतर हेच मद्यपी वाहने चालवितात. अनेकदा अपघात होतात. त्यात त्यांच्यासह सामान्य नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांकडून 31 डिसेंबरच्या रात्री दहा वाजल्यापासून ते एक जानेवारीला पहाटे पाच वाजेपर्यंत मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध "ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई केली जात आहे. मद्यधुंद चालकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची इत्यंभूत माहिती घेतली जाते. न्यायालयात खटलेही दाखल होतात. पोलिसांकडे असणाऱ्या माहितीमुळे संबंधित चालकांच्या नोकरी, चारित्र्य पडताळणी, पासपोर्ट, व्हिसाद्वारे परदेशवारीला अडथळा येणार आहेत.

देओल कुटुंबियाविरोधात पुण्यातील भाजप नेत्यावर आली न्यायालयात जाण्याची वेळ

"शूटिंग' होणार
मद्यपान करून वाहन चालविताना पोलिसांच्या चाचणीमध्ये आढळल्यानंतर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे. स्थिर, भरारी पथके व साध्या वेशातील पोलिसांचे पथक मद्यपी चालकांची चाचण्यांचे शूटिंग करणार आहेत.

..तर वाहनेही जप्त !
आतापर्यंत मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविल्यास खटले दाखल केले जात होते. मात्र, आता संबंधित व्यक्तींची वाहने तत्काळ जप्त करण्यात येणार आहेत किंवा पोलिस संबंधित वाहने ताब्यात घेणार आहेत. डीडी चाचण्यांमध्ये दोषी ठरलेली सर्व वाहने तिथल्या तिथे जप्त किंवा ताब्यात घेतली जातील.

मद्यधुंद चालकांमुळे अपघात होऊन त्याच्यासह इतरांच्याही जीवाला धोका असतो. अनेक अपघात मद्यपी चालकांमुळे घडतात. त्यामुळे मद्यपान करून वाहने चालवू नयेत. अन्यथा कडक कारवाई केली जाईल. ही कारवाई चारित्र्य पडताळणी, नोकरी, पासपोर्ट, व्हिसा व अन्य कारणांसाठी मोठी अडचणीची ठरेल. - डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com