लग्नस्थळाची चौकशी सोशल मीडियावर

लग्नस्थळाची चौकशी सोशल मीडियावर

पुणे - दांपत्यांतील वादाला कारणीभूत ठरत असलेला सोशल मीडिया साथीदाराच्या शोधात असलेल्यांना स्थळाची चौकशी करण्यासाठी मदत करीत आहे. त्यामुळेच पत्ता आल्यानंतर लगेच संबंधित मुलाचे किंवा मुलीचे सोशल मीडियावरील अकाउंट तपासण्याचे प्रमाण वाढले आहे.

स्थळ म्हणून आलेली ती किंवा तो कसा दिसतो, त्याचे सोशल मीडियावरील प्रोफाइल कसे आहे, त्याचे मित्र कोण आहेत, तो मीडियावर किती ॲक्‍टिव आहे, त्याने कशा पद्धतीच्या कॉमेंट केल्या आहेत आदी बाबी अकांउटवरून तपासल्या जात आहेत. तसेच त्याने किंवा तिने मॅट्रोमनी साइट आणि बायोडाटामध्ये दिलेली माहिती खरी आहे का, याची चाचपणी केली जात आहे. फेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्‌विटर आदी माध्यमे वापरणाऱ्या तरुणांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. आयुष्यातील अनेक घडामोडी ते माध्यमावर टाकतात. ही सर्व माध्यमे खुली असल्याने आपल्यासाठी स्थळ म्हणून आलेली व्यक्ती समजून घेण्याचा प्रयत्न यावर केला जात आहे.

संभाव्य साथीदाराची माध्यमावर माहिती तपासण्याचे प्रमाण १०० टक्के आहे. केवळ माध्यमांवरील माहितीद्वारे एखाद्याविषयी मत निर्माण करणे चुकीचे राहील. प्रत्यक्ष भेटूनच व्यक्ती समजून घेणे कधीही चांगले.
- गौरी कानिटकर, संचालिका, अनुरूप विवाह संस्था

पालकही ॲक्‍टिव्ह 
तरुणांसह ज्येष्ठ व्यक्तीदेखील मोठ्या प्रमाणात सोशल माध्यमांचा वापर करतात. त्यामुळे आपल्या मुलाला किंवा मुलीला आलेल्या स्थळातील व्यक्तीची माहिती समजून घेण्यासाठी तेदेखील संबंधितांचे सोशल अकाउंट चाळतात. मुलाला कोणते व्यसन तर नाही ना, त्याचे कपडे कसे असतात आदी बाबींवर पालकांचा कटाक्ष असतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com