जुन्नरला तनिष्का व्यासपीठाने उभारली सामाजिक संदेश देणारी गुढी 

दत्ता म्हसकर
शनिवार, 6 एप्रिल 2019

जुन्नर : तनिष्का व्यासपीठाचा वर्धापनदिन आज शनिवार ता.६ रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर येथील जुन्नर बारवच्या तनिष्कांनी गुढी उभारून साजरा केला आहे

जुन्नर : तनिष्का व्यासपीठाचा वर्धापनदिन आज शनिवार ता.६ रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर येथील जुन्नर बारवच्या तनिष्कांनी गुढी उभारून साजरा केला आहे. तनिष्का गटप्रमुख उज्वला शेवाळे, सदस्य, नायब तहसीलदार सचिन मुंढे, गटशिक्षणाधिकारी पांडुरंग मेमाणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष भरत चिलप, बार असोसिएशनचे केतन पडवळ तसेच नागरिक यांच्या उपस्थितीत सामाजिक संदेश देणारी 'मी मतदान करणारच' गुढी उभारली.

यावेळी मी मतदान करणारच ही शपथ ही घेण्यात आली. प्रास्ताविक उज्वला शेवाळे यांनी केले. उर्मिला थोरवे यांनी शपथ दिली. मुंढे व मेमाणे यांनी मतदान टक्का वाढविण्यासाठी हा चांगला उपक्रम असल्याचे सांगितले. सुनीता वामन यांनी सूत्रसंचलन केले. आभार पूनम तांबे यांनी मानले.
 

Web Title: social message Junnar was given by the Tanishka platform on gudhipadwa