सामाजिक प्रकल्पांची यादी सर्वांसाठीच हवी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पुणे - ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये (सीएसआर) येणाऱ्या प्रकल्पांची सर्वांसाठी उपलब्ध असेल अशी यादी असायला हवी. विविध कंपन्या ‘सीएसआर’द्वारे सामाजिक कार्यासाठी तयार आहेत; पण निधी देण्यासारखे योग्य सामाजिक प्रकल्पच अनेकांना ठाऊक नसतात,’’ असे मत मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्‍स पाइपच्या संचालिका रितू प्रकाश छाब्रिया यांनी व्यक्त केले. 

सामाजिक कार्यासाठी ‘फिनोलेक्‍स’ने मुकुल माधव फाउंडेशनची स्थापना केली. हे फाउंडेशन ‘सीएसआर’ पुरतेच मर्यादित न राहता कॉर्पोरेट मानसिकतेच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य करत आहे. १९९९ पासून रितू छाब्रिया यांनी मुकुल माधव फाउंडेशनची सुरवात केली. शिक्षण आणि आरोग्य या दोन प्राथमिक गरजांसाठी हे फाउंडेशन सुरवातीला काम करत असे. आता त्यांचे क्षेत्रही विस्तारले आहे. राज्यात पसरलेल्या कामांनंतर या फाउंडेशनने गुजरातमधील मासर येथे चार शाळा दत्तक घेतल्या आहेत. 

आमच्याकडे सीएसआर प्रकल्प आहेत का आणि असेल तर आम्हीही त्यात सहभागी होऊ, असे अनेक कंपन्या म्हणत असतात. त्यामुळे कंपन्या पैसे लावू शकतील, अशा योग्य सामाजिक प्रकल्पांची यादी तयार होण्याची गरज आहे, असे छाब्रिया म्हणाल्या. यंदाच मुकुल माधव फाउंडेशनने रत्नागिरीत मुकुल माधव विद्यालय स्थापन केले आहे. यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांतील शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावे, असा हेतू आहे. विशेष म्हणजे येथील शिक्षकांना वेळोवेळी पुण्यातील नामांकित शाळांमध्ये प्रशिक्षणही दिले जाते.

असे आहे मुकुल माधव फाउंडेशन 
मुकुल माधव फाउंडेशन सध्या शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, महिला शिक्षण, सामाजिक पाणी प्रकल्प व विविध सामाजिक जबाबदारीच्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. याशिवाय ग्रामीण भागात बाळंतपणातील पथ्य, योग्य प्रसूती, हृदयविकार व इतर आजारांबाबत घ्यायची काळजी व उपाय याविषयी विशेष अभ्यासक्रमही उपलब्ध करून दिला आहे. गुजरातमधील मासर व अभोर या गावांमध्ये महिलांसाठी कौशल्य विकास आणि संगणकाचे वर्गही घेतले जातात.

Web Title: social project list ritu prakash chabria