दुष्काळमुक्तीसाठी रात्रीचाही दिवस! (व्हि़डिओ)

ज्ञानेश्वर रायते
शनिवार, 28 एप्रिल 2018

वाढत्या तापमानामुळे इंदापुरातील ग्रामस्थांचा निर्णय

भवानीनगर (पुणे): सूर्यनारायणाने डोळे वटारल्यामुळे सकाळी अकरानंतर घरात आणि बाहेरही माणूस घामाघूम होत आहे. दुसरीकडे, स्पर्धेच्या श्रमदानाची लगीनघाई...यावर उपाय शोधत इंदापूर तालुक्‍यातील वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांनी रात्रीच्या वेळी श्रमदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंदापूर तालुक्‍यात पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. वाढत्या तापमानामुळे जिवाची काहिली होत आहे. त्यामुळे कष्टाच्या कामाच्या वेळाच बदलून गेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून तालुक्‍यातील बहुतांश गावांत रात्री आठनंतर अकरापर्यंत आणि सकाळी सातपासून दहापर्यंत सुरू असलेली श्रमदानाची कामे जागोजागी पाहायला मिळत आहेत. थोरातवाडी, लामजेवाडी, सराफवाडी, घोरपडवाडी अशा अनेक गावांत ग्रामस्थ सलग समतल चराची कामे, बांधबंदिस्तीची कामे दिव्यांच्या प्रकाशात करताना दिसत आहेत.

केवळ श्रमदानाचीच नाही, तर शेतीतील कष्टाची कामेही भल्या सकाळी व त्यानंतर संध्याकाळच्या वेळी केली जात आहेत. शेतातील पाणी देण्याची कामे वगळली, तर औषध फवारणीदेखील संध्याकाळी उन्हे कलल्यानंतर अथवा सकाळी लवकर केली जात आहेत. शेतमालाची तोडणीही संध्याकाळच्या वेळी करून रात्री किंवा सकाळी ती विक्रीसाठी पाठविली जात आहेत.

Web Title: social work for draught in sarafwadi indapur taluka