'समाजवादी विचारसरणीवर आधारित समाजनिर्मिती हवी'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

पुणे - ""देशातील महिलांचे प्रश्‍न हे कुठल्या एकाच धर्मापुरते मर्यादित नसून, ते सर्वच धर्मांत पाहायला मिळतात. आज लाखोंच्या संख्येत घटस्फोटित आणि परित्यक्‍ता महिलांचे प्रश्‍न गंभीर स्वरूपात उभे आहेत. ते सोडवायचे असतील तर, समाजवादी विचारसरणीवर आधारित समाजाची निर्मिती आवश्‍यक ठरेल,'' असे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी व्यक्त केले. 

मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि महात्मा जोतिराव फुले समता प्रतिष्ठानच्या वतीने समाजसुधारक हमीद दलवाई आणि सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजिलेल्या "सर्वधर्मीय परित्यक्ता व तलाकशुदा महिला मेळाव्या'त बुधवारी सावंत बोलत होते. या वेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, समाजवादी नेते भाई वैद्य, निवृत्त न्यायाधीश वि. वा. शहापूरकर, निवृत्त न्यायाधीश हेमंत गोखले, प्रा. शमसुद्दिन तांबोळी उपस्थित होते. 

सावंत म्हणाले, ""घटस्फोटित महिलांसाठी कायद्याने पोटगी देण्याची तरतूद आहे, मात्र त्यामध्ये अधिक सुधारणा अपेक्षित आहेत. सध्या सोशल मीडियाचा काळ आहे. त्याचा उपयोग करत महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विविध जनजागृती केली जायला हवी. तसेच, समाजाने बुरसटलेली मानसिकता बदलण्याची गरज आहे.'' 

आढाव म्हणाले, ""राज्यघटनेतील मूल्य समाजात रुजविण्यासाठी सरकार प्रयत्न करत नाही, तोपर्यंत महिलांना खऱ्याअर्थाने न्याय मिळणार नाही.'' 

Web Title: Socialist thinking based society needs