सोसायट्यांत वॉटर हार्वेस्टिंग नाही

Society
Society

पुणे - खासगी सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करून नियमबाह्य पद्धतीने पैसा जिरविण्याचा प्रयत्न नगरसेवकांकडून केला जात होता. मात्र, महापालिकेच्या आयुक्तांनी खासगी जागेत निधी खर्च करता येणार नाही, हे सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. त्यामुळे या प्रस्तावावर नगरसेवकांना पाणी सोडावे लागले.

प्रभाग क्रमांक १३ ब मधील सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी २५ लाखांचे वर्गीकरण मंजूर करण्याचा प्रस्ताव तसेच ‘स’ यादीतून नगरसेवकांना रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी १० लाख रुपये देणे, असे दोन प्रस्ताव सभेसमोर आले होते. ते नियमबाह्य असल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या लक्षात आले. 

दोन्ही प्रस्ताव सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचेच असल्याने त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच सोलर, सांडपाणी, वीज, कचरा यासाठी निधी खर्च करण्याची मागणी करून हा विषय लावून धरला. भाजपला प्रस्ताव दप्तरीही दाखल करता येत नव्हता व मंजूरही करता येत नव्हता. त्यामुळे त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला. 

दरम्यान, आयुक्त सौरभ राव यांनी खासगी सोसायट्यांमध्ये महापालिकेला काम करता येत नाही. कामच करायचे असेल तर ही जागा पालिकेच्या ताब्यात येणे गरजेचे आहे, अशी माहिती सभागृहाला दिली.  अखेर पालिकेच्या शाळां व इतर इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी निधी खर्च करण्यास मंजुरी द्यावी, अशी उपसूचना देऊन हे दोन्ही प्रस्ताव मान्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com