पुणे: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची प्रियकरानेच केली हत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

दुसऱ्या तरुणासोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयातून चाकूने भोसकून प्रियकराने तरुणीचा खून केल्याचा प्रकार चंदननगर येथे रात्री घडला. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे: दुसऱ्या तरुणासोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयातून चाकूने भोसकून प्रियकराने तरुणीचा खून केल्याचा प्रकार चंदननगर येथे रात्री घडला. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मीना पटेल (वय 23, रा. चंदननगर, मुळ रा. गोंदिया) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. किरण अशोक शिंदे (वय 25, रा. काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश बापू गप्पाट यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. 

किरण शिंदे हा पिंपरीतील एका महाविद्यालयात इंजिनीयरींगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तो हिंजवडीतील एका कंपनीत कामही करतो. मीना पटेल ही सुरूवातीला काळेवाडी भागात रहायला होती, त्यामुळे तिची आणि किरणची ओळख झाली. त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दरम्यान मीना ही चंदननगर येथील एका बीपीओमध्ये बॅक ऑफिसमध्ये नोकरी करत होती. गेल्या सहा मिहन्यांपासून तिने किरणशी बोलणे कमी केले. तिचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेम संबंध असल्याचा संशय आल्याने त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद झाले होता. दरम्यानच्या काळात ती चंदननगर भागात रहायला आली होती. त्यांचे भेटणे बंद झाले असले तरी दोघे वॉट्‌सऍपच्या माध्यमातून दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. 
मंगळवारी रात्री किरणने मीनाला चंदननगर येथील टाटा गार्डरूम जवळ भेटण्यासाठी बोलावले. तेथे त्याने तिला जाब विचारल्याने दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. त्यावेळी किरणने रागाच्या भरात तिच्यावर चाकुने सापसप वार केल्याने ती रक्तबंबाळ झाली. तेथून किरणने पळ काढल्यानंतर तिला नागरिकांनी रूग्णालयात दाखल केले, पण तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, किरण हा फरार झाला असून, त्याचा पोलिस शोध घेत आहेत. 

वाहतूक पोलिसांकडे घेतली धाव 
मीनावर चाकून वार केल्यानंतर येथेच 100 मीटर अंतरावर असलेल्या चौकात वाहतूक पोलिस उभे असल्याचे तिला दिसले. तिने जीव वाचविण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यावेळी किरणही तिचा पाठलाग करत होता. त्याने पोलिसाला पहातच त्याने पाठलाग करणे सोडून देऊन तेथून पळून गेला. पोलिसांनी त्याच्या मित्रांकडे, घरात चौकशी केली असात किरण हा दोन दिवासंपासून घरी आलाच नव्हता तसेच कामावरही गेला नव्हता. त्यामुळे त्याला सर्वजण शोधत होते, असे वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Software engineer killed his Girl friend in pune