

PNE26W18606
सोलापूर : पूनम गेटवरील आंदोलनात सहभागी ऑटोचालक.
...........
ऑटो चालकांचे लाक्षणिक धरणे आंदोलन
सोलापूर : वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी पूनम गेटवर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन झाले. या आंदोलनाद्वारे शासन आणि प्रशासनाचे लक्ष चालकांच्या समस्यांकडे वेधण्यात आले. यावेळी ऑटो एलपीजीचे दर कमी करणे, सर्व ऑटो एलपीजी पंप नियमितपणे सुरू ठेवणे, कल्याणकारी मंडळाची सभासद फी कमी करणे आणि सर्व चालकांचा कल्याणकारी मंडळात समावेश करावा आदी मागण्या करण्यात आल्या. तसेच प्रत्येक चालकाला वर्षातून एक गणवेश द्यावा. चालकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तत्काळ निर्णय घेण्यात यावा, अन्यथा वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद, प्रदीप शिंगे, इरफान कल्याणी, इम्रान शेख, शंकर राऊत आदी उपस्थित होते.
............
पद्मशाली शिक्षण संस्थेतर्फे शुक्रवारी शोकसभा
सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्थेचे माजी सरचिटणीस, विश्वस्त, माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचे मंगळवारी (ता. १२) निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवारी (ता. १५) शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेचे आयोजन दुपारी ४.३० वाजता कुचन प्रशालेच्या प्रांगणात करण्यात आले आहे. या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.