सोलापूरचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करणार - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पुणे - सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक-ऐतिहासिक स्थळे, खाद्यपदार्थ, सोलापूरची उत्पादने आदींचे मार्केटिंग करून, त्याच्या माध्यमातून जिल्ह्याचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करणार असल्याची ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

पुणे - सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक-ऐतिहासिक स्थळे, खाद्यपदार्थ, सोलापूरची उत्पादने आदींचे मार्केटिंग करून, त्याच्या माध्यमातून जिल्ह्याचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करणार असल्याची ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे पुण्यातील पंडित फार्म येथे सोलापूर प्रेमींचा मेळावा आयोजित केला होता. त्या वेळी देशमुख बोलत होते. या वेळी अभिनेते राहुल सोलापूरकर, एस. एस. इंजिनिअर्सचे संचालक शिवाजी भड, सोलापूर सोशल फाउंडेशनच्या संचालिका पूर्वा वाघमारे, सोलापूर सोशल फाउंडेशनचे पुणे अध्यक्ष भूषण कुलकर्णी उपस्थित होते. मेळाव्याला सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुके, गावांतील तसेच पुण्यात स्थायिक सोलापूरकर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘‘मायभूमीचा विकास करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. सोलापूरची तरुण पिढी व्यवसाय, रोजगारासाठी पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्थायिक झाली आहे. हे स्थलांतर थांबावे व त्यांना सोलापुरातच नोकरी, रोजगार, व्यवसाय करता यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यात कृषी पर्यटन लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाबरोबर चर्चा करून, त्यासाठी एक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.’’ 

या वेळी सोलापूरकरांनी आपापल्या गावचा दुष्काळ, पाणी, रस्ता अशा विविध समस्या व सूचना सहकार मंत्र्यांसमोर मांडल्या. देशमुख यांनी त्या ऐकून दूर करण्याचे आश्‍वासन दिले.

Web Title: Solapur Tourism Place Development Subhash Deshmukh