Solar Power Plant : पडकी जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प; सात हजार मेगावॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ट

शेतकऱ्यांच्या पडकी जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारून २०२५ पर्यंत सात हजार मेगावॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ट
solar power plant on waste land Aim to generate seven thousand megawatts of electricity pune
solar power plant on waste land Aim to generate seven thousand megawatts of electricity pune esakal

पुणे : शेतकऱ्यांच्या पडकी जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारून २०२५ पर्यंत सात हजार मेगावॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. त्यासाठी २८ हजार एकर जमिनीवर हे प्रकल्प उभारले जाणार आहे. यातून शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळेल आणि स्वस्त दरात वीज उपलब्ध होणार आहे.

राज्यातील ३० टक्के कृषी फीडर्स सौर ऊर्जेवर चालविण्याचे शिंदे फडणवीस सरकारचे ‘मिशन २०२५’ सुरू केले आहे, असे महावितरणचे स्वतंत्र संचालक आणि भाजपचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी सांगितले. ते गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी यावेळी अनिल कांबळे, दिनेश थिटे उपस्थित होते.

पाठक म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना -२.०’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांच्या हस्ते नुकताच या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. या अभियानात सौर ऊर्जेचा वापर करून डिसेंबर 2025 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान ३० टक्के कृषी फीडर्स सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांना दिवसा व भरवशाचा वीजपुरवठा होणार आहे. त्यामुळे आम्हाला रात्रीसह दिवसाही वीज पुरवठा करावा ही मागणी पूर्ण होणार आहे. या अभियानाच्या अंतर्गत राज्यात सौर ऊर्जेद्वारे ७ हजार मेगावॉट वीज निर्माण करून कृषी पंपांना पुरवठा करण्यात येईल. त्यासाठी ३० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

ग्रामीण भागात हजारो रोजगार निर्माण होतील. तसेच जे शेतकरी जमीन ३० वर्षासाठी भाड्याने देतील, त्यांना प्रतिवर्ष हेक्टरी सव्वा लाख रुपये वार्षिक भाडे मिळेल, तसेच त्यामध्ये दरवर्षी वाढ केली जाणार आहे.

शेतीसाठी सध्या सरासरी दीड रुपये प्रती युनिटने वीज पुरवठा होत असला तरी ती वीज महावितरणला सरासरी साडे आठ रुपये प्रती युनिट दराने मिळते. दरातील फरक राज्य सरकारचे अनुदान आणि उद्योगांसाठीच्या वीज दरावर लावलेला क्रॉस सबसिडीचा भार यातून भरून काढला जातो.

सौर ऊर्जेद्वारे मिळणारी वीज सुमारे तीन रुपये तीस पैसे प्रति युनिट दारापर्यंत मिळणार असल्याने भविष्यात उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होऊन उद्योग, व्यवसायांच्या वीज दरात घट होऊ शकेल, असे पाठव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com