शिर्सुफळचा सौरऊर्जा प्रकल्प कर आकारणीची बैठक संपन्न

Solar Power project tax assessment meeting was done in shirsufal
Solar Power project tax assessment meeting was done in shirsufal

शिर्सुफळ - शिर्सुफळ (ता. बारामती) येथील सुमारे 103 हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या 50 मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कर आकारणीबाबत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या मध्ये झालेल्या बैठकीत ग्रामपंचायतीच्या वतीने 5 रु प्रति चौरस मीटर तर कंपनीकडून किमान 1.50 रु प्रती चौरस मीटर दर आकारण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये निर्णय होऊ शकला नाही. याबाबत वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन मागवण्याचे निश्चित करण्यात आले. 

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित अर्थात 'महानिर्मिती' व खाजगी लोकसहभाग (वेल्स्पन सोलर एनर्जी) तत्वावर बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे सुमारे 103 हेक्टर क्षेत्र ताब्यात घेवुन 82.89 हेक्टर क्षेत्रावर 'ग्रीन कनेक्टेड' तंत्रज्ञानावर आधारित तब्बल 50 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. सन 2014-15 पासुन रोजची कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या कंपनीकडे ग्रामपंचायतीकडून अनेक वेळा कराबाबातची मागणी करण्यात आली. मात्र कर दराबाबत एक वाक्यता होत नव्हती या पार्श्वभूमीवर महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक पार पडली. यामध्ये एकुण क्षेत्राच्या सन 2015 च्या रेडीरेकनरच्या दराप्रमाणे वापरात असलेल्या एकुण 8 लाख 28 हजार 900 चौरस मीटर क्षेत्राला किमान कर (1रुपया 50 पैसै) आकारण्याची मागणी कंपनीच्या वतीने करण्यात आली. तर ग्रामपंचायतीच्या वतीने यापूर्वी झालेल्या ग्रामसभेच्या ठरावानुरुप 5 रुपये प्रति चौरसीटर दर आकारण्याची मागणी करण्यात आली. यामुळे याबाबत वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन मागवण्याचे निश्चित करण्यात आले.या बैठकीला सरपंच आप्पासाहेब आटोळे, उपसरपंच राजेंद्र आटोळे, सौरऊर्जा विभागाचे मुख्य अभियंता विजय माहुलकर, कार्यकारी अभियंता नरहर बऱ्हाटे, उपकार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग प्रफुल्ल बच्छाव, विजय कुलकर्णी, ग्रामसेवक दत्तात्रय धावडे यांच्यासह ग्रामपंचायत सात ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

डिसेंबर 2014 मध्ये कार्यान्वित करण्यात आले. या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 83 दशलक्ष युनिटसची विजनिर्मिती होत आहे. असे असताना सदर प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर शासकीय दराप्रमाणे ग्रामपंचायतीला कर देणे आवश्यक होते. मात्र यास टाळाटाळ केली जात होती. अखेर 2 जुलै 2018 च्या शासन निर्णयाचा आधार घेवुन कंपनीकडून कर आकारणी करण्याची मागणी करण्यात आली तर कंपनीला मोठा नफा मिळत आहे. यामुळे कमाल करआकारुन गाव विकासाच्या साठी जास्तीत रक्कम वसुल करण्याबाबतचा आग्रह ग्रामसभेने धरला आहे. यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे सध्यातरी हा प्रकल्प म्हणजे गावासाठी फक्त शोभेची वास्तुच ठरत आहे. 

ग्रामसेवक करील ते गाव काय करील...
गाव करील ते राव काय करील अशी म्हण प्रचलित आहे. परंतू शिर्सुफळ येथे गेल्या सहा वर्षापासुन एकाच ठिकाणी कार्यरत असलेले ग्रामसेवक मात्र अनेक करामती करीत आहेत. ग्रामसभेमध्ये दराबाबत अंतिम निर्णय घेण्याचे ठरले आहे. मात्र बैठक फक्त मोजक्याच पदाधिकाऱ्यासह झाली. याबाबत ग्रामसेवक यांना विचारले असता ग्रामसभेत फक्त चर्चा झाली ठरले कुठे होते. तसेच मुंबई वरुन आलेल्या अधिकारी ग्रामसभेत कुठे बोलतात का असा उलट प्रश्न केला.यामुळे ग्रामसेवक करील ते गाव काय करील अशीच चर्चा सर्वत्र होती.  

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com