esakal | नारायणगाव : घन कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पास सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

narayangaon

नारायणगाव : घन कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पास सुरुवात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : येथील नारायणगाव व वारूळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील जमा केलेल्या वीस हजार मेट्रिक टन घन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे विलगीकरण करून त्या पासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प आज दुपार पासून कार्यान्वित करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत पातळीवर दोन ग्रामपंचायतिने एकत्रितपणे सुरू केलेला हा पहिलाच प्रकल्प आहे.अशी माहिती सरपंच योगेश पाटे ( नारायणगाव), सरपंच राजेंद्र मेहेर ( वारूळवाडी) यांनी दिली.

हेही वाचा: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून पीएमपीला हवेत २२३ कोटी

या प्रकल्पाचा प्रारंभ आज दुपारी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्या हस्ते झाला. या वेळी जिल्हा परिषदेच्या घन कचरा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रवीण खंडागळे, विघ्नहरचे संचालक संतोष खैरे, माजी सरपंच जंगल कोल्हे, आरिफ आतार, संतोष दांगट, ग्रामविकास अधिकारी नितिन नाईकडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे-नाशिक दीड तासांत! हाय स्पीड रेल्वेसाठी जमीन अधिग्रहण

या बाबत सरपंच पाटे, मेहेर म्हणाले नारायणगाव व वारूळवाडी या जुन्नर तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती आहेत.सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे ही या भागातील मोठी समस्या आहे.या भागातील कचरा रोज येथील गणपिर बाबा टेकडी जवळ टाकला जातो.१९८७ पासून या ठिकाणी सुमारे वीस हजार मेट्रिक टन कचरा साठला आहे.या मुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. घरमाशा, प्लॅस्टिक कचऱ्यामुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्या होत्या. या भागातील शेतकरी व नागरिक यांच्या तक्रारीची दखल घेऊन घन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या पासून उपयोगी व निरुपयोगी घटक वेगळे करण्याचा निर्णय घेतला. उपयोगी घटकापासून सेंद्रीय खत तयार करण्यात येणार असून प्लॅस्टिक, काचा व धातु आदी निरुपयोगी घटक वेगळे करण्यात येणार आहे. वीस हजार मेट्रिक टन कचऱ्या पासून सुमारे तीन हजार मेट्रिक टन सेंद्रिय खत तयार होणार आहे.या खत विक्रीतुन ग्रामपंचायतीना उत्पन्न मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सोळा लाख रुपयांचा खर्च १४ व्या वीत्त आयोग निधीतून करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा घन कचरा व्यवस्थापन तज्ञ खंडागळे यांनी मार्गदर्शन केले आहे. घन कचरा व्यवस्थापन तज्ञ प्रवीण खंडागळे म्हणाले, ''घन कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करून यंत्राव्दारे कचऱ्यातील माती, खत व प्लॅस्टिक, काचा धातु आदी घन पदार्थ वेगळे करून शुद्धीकरण केले जाणार आहे.या पासून तयार होणाऱ्या सेंद्रीय खातात नत्र, स्फुरद व पालाश हे घटक असल्याने हे खत शेतीला उपयुक्त आहे. खत व घन पदार्थ विक्रीतुन ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणार आहे.''

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील 442 ग्रामपंचायती कोरोनामुक्त