esakal | पुणे जिल्ह्यातील 442 ग्रामपंचायती कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

पुणे जिल्ह्यातील 442 ग्रामपंचायती कोरोनामुक्त

sakal_logo
By
गजेंद्र बडे -सकाळ वृत्तसेवा

पुणे ः पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असला तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संसर्ग मात्र दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मागील महिनाभरापासून जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात दररोज सरासरी दोन हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. अशा बिकट परिस्थितीत जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींनी मागील सव्वा वर्षापासून आजतागायत आपापल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ दिलेला नाही. याशिवाय अन्य ४४२ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत.

हेही वाचा: पुणे महापालिका, ZPची म्युकरमायकोसिस रुग्णांची शोधमोहिम

जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पुणे व पिंपरी चिंचवड शहरालगतच्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या गावांमध्ये प्रामुख्याने हवेली तालुक्यातील वाघोली, लोणीकंद, किरकटवाडी, मांजरी बुद्रूक, मांजरी खुर्द, नांदेड, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, पेरणे, केसनंद, मुळशी तालुक्यातील बावधन, भूगाव, पिरंगुट, मारुंजी, हिंजवडी, लवळे, सूस, भुकूम, माण, म्हाळुंगे आदी गावांचा प्रामुख्याने समावेश आहे. या गावांसह जिल्ह्यातील ११७ गावांमध्ये हाय ॲलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा: सीरमकडून लस खरेदीसाठी परवानगी द्या; पुणे महापालिकेची केंद्राकडे मागणी

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० रोजी पुणे शहरात सापडला होता. परंतु पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिला रुग्ण १० मार्च २०२० ला हवेली तालुक्यातील मांजरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आढळून आला होता. त्यानंतर हवेली पाठोपाठ वेल्हे तालुक्यात कोरोना रुग्ण वेगाने सापडू लागले होते. जिल्ह्यात एकूण १ हजार ४०३ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ९१३ ग्रामपंचायतींच्या हद्दीत सध्या सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींपैकी ४४२ कोरोनामुक्त झाल्या आहेत. अन्य ४८ ग्रामपंचायतींनी अद्याप कोरोनाचा शिरकाव होऊ दिलेला नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५३७४ जणांना डिस्चार्ज तर ६४१ नवीन रुग्ण

हाय ॲलर्ट प्रमुख ग्रामपंचायती- गावडेवाडी, अवसरी बुद्रूक, धामणी, कळंब, लांडेवाडी (सर्व ता. आंबेगाव), माळेगाव बुद्रूक, पणदरे, वडगाव निंबाळकर, काटेवाडी, होळ, डोर्लेवाडी (सर्व ता. बारामती), शिंदेवाडी, सारोळा, कांजळे (भोर), यवत, बोरीऐंदी, खामगाव, केडगाव, गोपाळवाडी (दौंड), निमगाव केतकी, कळस, अकोले, कळंब, पळसदेव, निंबोडी (इंदापूर), पिंपरी पेंढार, शिरोली बुद्रूक, आळे, ओतूर, बुचकेवाडी, डिंगोरे, पिंपळवंडी (जुन्नर), दावडी, कडाचीवाडी, खराबवाडी, कुरुळी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, निघोजे, शिरोली (खेड), सोमाटणे, कुसगाव बुद्रूक (मावळ), नीरा, वीर, नायगाव (पुरंदर), शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, कारेगाव, मांडवगण फराटा (शिरूर).

हेही वाचा: पुणे-नाशिक दीड तासांत! हाय स्पीड रेल्वेसाठी जमीन अधिग्रहण