कासारसाईत ४०, ‘पवना’त ३५ टक्के साठा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

सोमाटणे - पवन मावळात रविवारी पावसाचा जोर आणखी वाढला असून, कासारसाई धरण ४० टक्के; तर पवना धरण ३५ टक्के भरले आहे. आढले, मळवंडी, पुसाणे धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे.

सोमाटणे - पवन मावळात रविवारी पावसाचा जोर आणखी वाढला असून, कासारसाई धरण ४० टक्के; तर पवना धरण ३५ टक्के भरले आहे. आढले, मळवंडी, पुसाणे धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे.

रविवारी पहाटे तीनच्या सुमारास पवन मावळात संततधार पावसाला सुरवात झाली. दुपारी पावसाचा जोर आणखी वाढला. रविवारी दिवसभरात पवना धरण परिसरात १०० मिलिमीटर; तर एकूण ८०० मिलिमीटर पाऊस झाला. धरणात उपयुक्त पाणीसाठा ८७ दशलक्ष घनमीटर; तर एकूण पाणीसाठा १२० दशलक्ष घनमीटर झाला असून, धरण ३५.३ टक्के भरले आहे. कासारसाई धरण परिसरात रविवारी दिवसभरात २० मिलिमीटर पाऊस पडला. एकूण पाऊस २७३ मिलिमीटर पडला. धरणात उपयुक्त पाणीसाठा ६.५० दशलक्ष घनमीटर; तर एकूण पाणीसाठा ८ दशलक्ष घनमीटर झाला आहे. धरण ४० टक्के भरले आहे.

मळवंडी, आढले, पुसाणे धरण परिसरात दिवसभरात २५ मिलिमीटर; तर एकूण पाऊस ३६० मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे तिन्ही धरणे ओव्हरफ्लो झाली असून, त्यांच्या सांडव्यावाटे पाणी वाहू लागले आहे. या पावसामुळे पवनेचा पूर आठ दिवसांनंतरही कायम असून, या पुरामुळे साळुंब्रे पूल पाण्याखाली आहे. बेबडओहोळ, थुगाव, कडधे पुलाजवळ पवना नदी धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहे.

Web Title: somatane pune news water storage in dam