

Sharad Pawar Someshwar Election baramati
esakal
Someshwar Sugar Factory : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी पवार कुटुंबीयांची बैठक झाली. त्यामुळे कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.