किरकोळ वादातून जावयाने केला सासूचा खून

Sun in law killed his mother in law at Aundh Pune
Sun in law killed his mother in law at Aundh Pune

पुणे (औंध) : सासूसोबत झालेल्या किरकोळ वादातून जावयाने डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने सासूचा मृत्यु झाल्याची घटना पाषाण येथील संजय गांधी वसाहत येथे आज पावणे तीनच्या सुमारास घडली.

सुदामती देवराम गायकवाड (वय 60 वर्षे) असे मृत सासूचे नाव असून दिगंबर ओव्हाळ या जावयाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली. दिगंबर व त्याची पत्नी जयश्री हे दोघेही सुदामती यांच्या जवळच राहत होते. सुदामती या वारकरी सांप्रदायाच्या असल्याने त्याला असलेले दारुचे व्यसन त्यांना खटकत असे. यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते. परंतु आज दुपारी सासू व जावयात वाद झाला व यावर चिडून दिगंबरने सासूच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला यातच त्यांचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती चतुःश्रृंगी पोलीसांना कळताच घटनास्थळी हजर झाले. या प्रकरणी पंचनामा करुन दिगंबर यास त्वरीत ताब्यात घेतले व सुदामती यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससूनमध्ये पाठवण्यात आला असून पुढील तपास चतुःश्रृंगी पोलीस करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जााधव यांनी दिली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com