shankar ithape
sakal
सोमेश्वरनगर - सोमेश्वर कारखान्यावर गेली अठरा वर्षे ऊसतोडीसाठी येत असलेल्या सोमीनाथ व बबिता इथापे यांचा मुलगा शंकर इथापे हा सैन्यदलात अग्निवीर म्हणून भरती झाला. मागच्या तीन पिढ्या ऊसतोड करणाऱ्या इथापे कुटुंबातील भरती झालेला तो पहिलाच. आईवडिलांनी ऊस तोडणीवर उचल घेऊन त्याला अकादमीत घातले आणि अवघा साडेसतरा वर्षाचा असतानाच तो भरती झाला.