esakal | मुलाचं आजारपणचं ठरलं मायलेकाच्या खूनाचं कारण?, बेपत्ता वडिलांवर संशय
sakal

बोलून बातमी शोधा

Police

मुलाचं आजारपणचं ठरलं मायलेकाच्या खूनाचं कारण?, बेपत्ता वडिलांवर संशय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - मुलाच्या (Son) सततच्या आजारपणातुनच (Sickness) आई-मुलाचा खुन (Murder) झाला असल्याची शक्‍यता भारती विद्यापीठ पोलिसांनी (Police) वर्तविली आहे. त्युाळे संशयाची सुई आता मुलाच्या बेपत्ता वडीलांभोवती फिरत असून गुन्हे शाखा व भारती विद्यापीठ पोलिसांची सहा पथके त्याच्या शोधावर आहेत. (Son Sickness Mother Murder Reason Missing Father Suspected)

धानोरी येथील आलिया आबिद शेख (वय 35) व त्यांचा मुलगा आयान आबिद शेख (वय 6) यांचा खुन करून आयानचा मृतदेह कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ तर आलिया शेख यांचा मृतदेह सासवड-जेजुरी रस्ता येथे टाकून देण्यात आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ व पुणे ग्रामीण पोलिसांच्या सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेपासून आयानचा वडील आबिद शेख हा बेपत्ता आहे.

हेही वाचा: पुणे : विद्यापीठाची द्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार

आबिद व आलिया हे दाम्पत्य मुळचे मध्यप्रदेशातील असून त्यांनी प्रेमविवाह केल्यानंतर 2007 पासून ते नोकरीच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्य करीत होते. दोघेही उच्चशिक्षीत व सधन कुटुंबातील होते. आबिद शेख हा एका कंपनीमध्ये नोकरीस आहे. तर आलिया या एका वित्तपुरवठा कंपनीमध्ये नोकरी करीत होत्या. तर मात्र त्यांचा मुलगा आयान हा स्वमग्न (ऑटीझम) आजाराने ग्रस्त असल्यामुळे आलिया यांनी नोकरी सोडून मुलाच्या संगोपनावर लक्ष्य केंद्रीत केले होते. आबिदने पत्नी व मुलाला फिरायला नेण्यासाठी 11 ते 14 जुन दरम्यान कार भाड्याने घेतली होती. पहिले तीन दिवस कुटुंब फिरायला गेल्यानंतर सायंकाळी घरी परत येत होते.

14 जुन रोजी आबिद कुटुंबाला घेऊन सासवड, दिवेघाट, बनेश्‍वर, बोपदेव घाट, दिवेघाटातून सासवडला गेला. तेथेच त्याने आलियाचा खुन केला असण्याची आणि त्यानंतर मुलाचा खुन केला असण्याची पोलिसांना शक्‍यता आहे. त्यानंतर त्याने 15 जुन रोजी मध्यरात्री एक वाजता मार्केट यार्ड येथे गाडी सोडून स्वारगेटच्या दिशेने पायी गेल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कळसकर जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालामध्ये आलियाचा मृत्यु जबर मारहाणीने तर मुलाचा मृत्यु गळा आवळून झाल्याचे नमूद केले आहे.

'गुन्हे शाखा व भारती विद्यापीठ पोलिसांकडून या खुन प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. मुलाचे वडील आबिद शेख याच्यावरती संशय आहे. त्यादृष्टीने त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल.'

- सागर पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन.

loading image