esakal | पुणे : विद्यापीठाची द्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : विद्यापीठाची द्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार

पुणे : विद्यापीठाची द्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम ते अंतिम वर्ष पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या द्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२१ मध्ये टप्प्या-टप्प्याने होणार आहेत. एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या या परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर पडल्या होत्या. या परीक्षांबाबत मार्गदर्शक तत्त्वे व सूचना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१च्या द्वितीय सत्राच्या नियमित व अनुशेषित विद्यार्थ्यांच्या तसेच बहि:स्थ, श्रेणीसुधार विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, मौखिक, सेमिनार, प्रोजेक्ट्स, डेझरटेशन आदी परीक्षांचे आयोजन महाविद्यालय स्तरावर पूर्ण करण्यात यावे. हे अंतर्गत गुण संगणक संरक्षित प्रणालीमार्फत विद्यापीठाकडे पाठवावे लागणार आहे. द्वितीय सत्राची समरी उपलब्ध झाल्यावर त्वरित गुण भरणे अनिवार्य राहणार आहे, अशी सूचना विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा: पुणे विद्यापीठाच्‍या जुलै-ऑगस्‍टमध्ये ऑनलाइन उन्हाळी परीक्षा

द्वितीय सत्राच्या परीक्षेच्या वेळी डेझरटेशनकरिता परीक्षा अर्ज भरलेल्या एम.ई, एम.फार्म, एम. आर्किटेक्चर या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी डेझरटेशनच्या परीक्षांचे महाविद्यालय स्तरावर प्राचार्य यांनी परीक्षकांची समिती करून विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाच्या मूल्यमापन करण्यात यावे. आणि त्यात मिळालेले गुण ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पाठविणे आवश्यक आहे, असे काकडे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: पुणे झेडपीच्या आरोग्य विभागात मेगा भरती

विद्यार्थ्यांसाठी सूचना :

- परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल

- परीक्षेची सर्व माहिती विद्यार्थ्यांना एसएमएस व ई-मेलवर पाठवली जाईल.

- ऑनलाइन परीक्षेसाठी छायांकित प्रत व फेरमूल्यांकनाची सुविधा मिळणार नाही.

- विज्ञान शाखेच्या अंतिम वर्ष अंतिम सत्र परीक्षा ७० टक्के अभ्यासक्रमावर होतील.

- उर्वरित सर्व विद्याशाखांच्या परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर होतील.

अशी होईल परीक्षा :

- ऑनलाइन परीक्षेसाठी ६० बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) असतील

- त्यातून ५० प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरले जातील

- परीक्षेचा कालावधी असेल एक तास (६०

मिनिटे)

- परीक्षेनंतर ४८ तासांत विद्यार्थ्यांना स्टुडंटस प्रोफाइलमार्फत गुण उपलब्ध होतील

- मुख्य परीक्षा सुरू होण्याआधी तीन दिवस सराव परीक्षा असेल

हेही वाचा: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच : अमोल कोल्हे

loading image