शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आत्मियता निर्माण करावीः जैन

युनूस तांबोळी
सोमवार, 9 एप्रिल 2018

टाकळी हाजी (ता. शिरूर): राज्यात कृषी व शिक्षण विभाग महत्वाचा असताना त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. एकूण नियोजीत अर्थसंकल्पातून 50 हजार कोटी रूपये खर्च केवळ शिक्षणावर केला जातो. शिक्षणाबाबत जगात नवनवे विचार बाहेर येऊ लागल्याने जिज्ञासूवृत्तीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आत्मियता निर्माण करण्याचे आवाहन राज्याचे अर्थविभागाचे अतीरिक्त वित्त सचीव डी. के. जैन यांनी केले.

सोनेसांगवी (ता. शिरूर) येथे झालेल्या कंपनीचा सीएसआर फंड व लोकसहभागातून जिल्हा परीषदेला अद्यायावत शाळेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, गटविकास अधिकारी संदिप जठार, कंपनीचे व्यवस्थापक मनोज शुक्ला, अविनाश अग्रवाल, सरपंच दत्तात्रेय कदम, गट शिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर आदी ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थीत होते.

जैन म्हणाले की, राज्यात सर्व शिक्षा अभीयान योजना व शिक्षण हक्काचा कायदा आल्याने शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला आहे. शेती क्षेत्रात देखील वेगवेगळे तंत्रज्ञान मिळवून देण्याची जबाबदारी कंपन्यानी सामाजीक बांधिलकी म्हणून पार पाडावी. नव्याने तयार झालेल्या या इमारतीची चांगली देखभाल करून यापुढील काळात कंपन्यांकडून भौतीक सुवीधा मिळवाव्यात. विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा वाढविताना सांस्कृतीक व संस्कृतीयुक्त विद्यार्थी घडविण्याचे आवाहन केले.

डोके म्हणाले की, सामाजीक बांधिलकी म्हणून कंपन्यांनी अद्यायावत दिलेली जिल्हा परीषदेला इमारत ही गोष्ट कौतुकास्पद आहे. विशीष्ट ध्येय ठेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. शासनाच्या माध्यमातून मुलींसाठी सॅनेटरी नॅबकीन चे लवकरच वाटप करण्यात येणार आहे. या गोष्टीचा शिक्षकांनी प्रचार व प्रसार करावा.

Web Title: sonesangvi shirur csr fund and zp school