"सोसा'चे खुले संशोधन व्यासपीठ भारतात 

सकाळ न्यूज नेटवर्क 
शनिवार, 2 जून 2018

पुणे - परंपरा आणि नावीन्याच्या माध्यमातून सामान्यजनांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सामाजिक क्षेत्रात प्रयत्नशील असलेल्या "एपी ग्लोबाले ग्रुप' कंपनीचाच भाग असलेल्या "डीसीएफ व्हेंचर्स'ने आता इस्राईलमधील संशोधनाचे खुले व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "सोसा'चा प्लॅटफॉर्म भारतामध्ये उपलब्ध केला आहे. 

पुणे - परंपरा आणि नावीन्याच्या माध्यमातून सामान्यजनांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सामाजिक क्षेत्रात प्रयत्नशील असलेल्या "एपी ग्लोबाले ग्रुप' कंपनीचाच भाग असलेल्या "डीसीएफ व्हेंचर्स'ने आता इस्राईलमधील संशोधनाचे खुले व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "सोसा'चा प्लॅटफॉर्म भारतामध्ये उपलब्ध केला आहे. 

नवतंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रगतिशील कॉर्पोरेट संस्था आणि संघटनांना मार्ग दाखविण्याबरोबरच त्यांना सर्वसमावेशक संधी उपलब्ध करून देण्याचे काम "सोसा'च्या माध्यमातून केले जाते. जगातील आघाडीचे स्टार्टअप राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्राईलच्या मार्गदर्शनाचा लाभ आता भारतातील स्टार्टअप आणि नवउद्योजकांना होऊ शकेल. इस्राईलमधील 25 आघाडीचे गुंतवणूकदार आणि उच्च तंत्रज्ञानक्षेत्रातील नवउद्योजकांनी एकत्र येत 2013 मध्ये "सोसा' हे संशोधनाचे खुले व्यासपीठ असणाऱ्या नेटवर्कची सुरवात केली होती. या माध्यमातून स्टार्टअप्स, नवउद्योजक, कंपन्या आणि गुंतवणूकदारांना एका छत्राखाली आणण्यात आले होते. 

कॉर्पोरेट क्षेत्रातील संशोधनाच्या बाबतीत निर्माण होणारी मागणी आणि पुरवठ्यातील तफावत कमी करण्याचे महत्त्वपूर्ण काम "सोसा' करते. उद्योगक्षेत्रामध्ये नावीन्याचा ध्यास घेतलेल्या आणि काहीतरी वेगळे करू पाहणाऱ्यांना "सोसा' नेहमीच मदत करते. एखाद्या कंपनीने एकदा"सोसा'च्या नेटवर्कमध्ये प्रवेश केल्यानंतर "सोसा'ची एक खास टीम त्यांना नेहमी मदत करत राहते. याशिवाय कॉर्पोरेट कंपन्यांना "सोसा'च्या माध्यमातून इस्राईल आणि न्यूयॉर्क येथे संशोधन हबही सुरू करता येऊ शकते. 

"डीसीएफ'ची व्याप्ती 
खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील विविध संस्थांसोबत "डीसीएफ व्हेंचर्स' काम करत आहे. कॉर्पोरेट संशोधन कार्यक्रमाच्या निर्मितीबरोबरच भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्टार्टअप सिस्टिमला अनुकूल वातावरण या माध्यमातून तयार केले जाते. सध्या देशभरातील नऊ हजार स्टार्टअप्स या कंपनीशी जोडले गेले असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्टार्टअप्सना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांना भारतीय बाजारपेठेतील प्रवेशाची रणनीती आखून देण्याचे कामही "डीसीएफ व्हेंचर्स'च्या माध्यमातून केले जाते. 

भारतातील स्टार्टअप विश्‍ववेगाने विस्तारत असले तरीसुद्धा नवउद्यमशीलता निर्देशांकात भारत 69 व्या स्थानी आहे. "सोसा'च्या माध्यमातून आम्हाला भारताप्रमाणेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांच्या गरजादेखील पूर्ण करता येतील. भारतामध्ये खूप क्षमता आहे, "डीसीएफ व्हेंचर्स'सोबत भागीदारी करताना आम्हाला आनंदच होतो आहे. 
ऊझी शिफर, सीईओ "सोसा' 

"सोसा'शी भागीदारी करताना आम्हाला अत्यानंद होतो आहे, भारत आणि इस्राईलमधील मैत्रीसंबंध फार जुने आहेत. आपल्याकडे रिटेल आणि सेवा उद्योगात अनेक चांगली उदाहरणे पाहायला मिळतील. तंत्रज्ञानक्षेत्रामध्येही अशी उदाहरणे कमी नाही. आता दोन कंपन्यांमधील भागीदारीमुळे संशोधन आणि नवउद्यमशीलतेचे एक नवे पर्व सुरू होत आहे. 
- लक्ष्मी पोतलुरी, सीईओ "डीसीएफ व्हेंचर्स' 

Web Title: Sosa open research platform in India