आंबट-गोड बोरांचा हंगाम आला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

पुणे - नारंगी, पिवळसर, लालसर रंगाची आणि विविध आकारांची चवीला आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. पाऊस चांगला झाल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम समाधानकारक राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

पुणे - नारंगी, पिवळसर, लालसर रंगाची आणि विविध आकारांची चवीला आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. पाऊस चांगला झाल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम समाधानकारक राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

दिवाळीच्या सुमारास बाजारात बोरांची आवक सुरू होते. ती हळूहळू वाढत जाते, डिसेंबर, जानेवारी महिन्यात बोरांचा हंगाम बहरात असतो. फेब्रुवारी महिन्यात हा हंगाम संपतो. गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने बोरांचे उत्पादन कमी झाले होते. यंदा पावसाने हात दिल्याने बाजारात आवक वाढू लागली आहे. मार्केट यार्डात सरासरी प्रति दिवस 500 ते 600 गोण्या इतकी आवक होत आहे. ती पुढील काळात आणखी वाढेल. सध्या बाजारात सोलापूर जिल्ह्यातील आष्टी, मोहोळ, खंडाळी आदी गावांतून बोरांची आवक होत आहे. यामध्ये चमेली, चेकनट, उमराण या बोरांचा समावेश आहे. राजस्थानात उत्पादन होणारी चन्या-मन्या ही बोरे पुण्याच्या बाजारात येत आहे. नगर जिल्ह्यातून "बकुळा' या प्रकाराच्या बोरांची आवक साधारण जानेवारी महिन्यात सुरू होईल. त्याचप्रमाणे "ऍपल बोरा'ची आवक त्याच काळात सुरू होईल. आकाराने मोठे, रंगाने हिरवे आणि गर जास्त असलेले ही बोरे आता लोकप्रिय होऊ लागले आहे. 

याबाबत व्यापारी अरविंद शहा म्हणाले, ""बोरांची आवक वाढली असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत ती चांगली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने बोरांना सध्या भाव मिळत आहे. ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे अशा भागातील उत्पादनावर परिणाम झाला आहे. उजनी धरणाच्या कालव्यातून पाणी मिळणाऱ्या बोरांच्या बागांतून उत्पादन चांगले आहे. यावर्षी हंगाम समाधानकारक राहील.'' 

आष्टी गावातील बोर उत्पादक शेतकरी मोतीराम कदम म्हणाले,""सोलापूर जिल्ह्या यावर्षी पाऊस उशिरा झाला. तसेच परतीचा पाऊसही कमी झाला. त्यामुळे बोरांचे उत्पादन कमी होणार आहे. झाडांची निगा वर्षभर राखावी लागते. तसेच औषध फवारणी, छाटनी करावी लागते. साधारणपणे प्रति एकर दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळते.'' 

बोरांचे भाव पुढील प्रमाणे (प्रति दहा किलो) 

चमेल : 220 रुपये 

चेकनट : 600-700 रुपये 

उमराण : 150-200 रुपये 

चन्या-मन्या : 250-300 रुपये 

Web Title: Sour-sweet bore of the season