दक्षिण पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

Pune Water Cut off: सिंहगड रस्ता परिसरासह शहराच्या दक्षिण भागामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार आहे. वडगाव जलशुद्धीकरण केंद्र-टप्पा एकमधील जलवाहिनीवर बंद प्लेट बसविणार आहे.
Pune Water Cut off

water scarcity

ESakal

Updated on

Pune Water Cut off: वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी गुरुवारी (ता. १२) देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी सातारा रस्ता, सिंहगड रस्ता परिसरासह शहराच्या दक्षिण भागामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार आहे. वडगाव जलशुद्धीकरण केंद्र-टप्पा एकमधील जलवाहिनीवर बंद प्लेट बसविणार आहे. याबरोबरच याच ठिकाणी तीन नवीन किऑस्क बसविण्याचे काम गुरुवारी केले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com