खेड तालुक्यात पावसाअभावी पेरण्या रखडल्या

Rice-Cultivation
Rice-Cultivation

राजगुरूनगर - पावसाने दडी मारल्याने खेड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  भात आणि बटाटा लागवडी रखडल्या आहेत, तर सोयाबीनच्या पेरण्या दोन आठवड्यांपूर्वीच उरकल्या असून, पीकवाढीसाठी पावसाकडे डोळे लागले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खेड तालुक्यात खरीपाचे ४८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी २९ हजार हेक्टरवर, म्हणजे ६१ टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे यांनी दिली. तालुक्यात खरीपाचा पॅटर्न बदलत असून सोयाबीनचे क्षेत्र दरवर्षी वाढतानाच दिसत आहे. सोयाबीनची ७ हजार ३०० हेक्टरवर पेरणी झाली असून, ती सरासरीच्या १४७ टक्के आहे. मात्र खरीपाचे मुख्य पीक असलेल्या भाताच्या लागवडी रखडल्या आहेत. तालुक्यात दरवर्षी जुलैच्या मध्यापर्यंत बहुतांश भातलागवडी उरकतात. त्यासाठी भाताची रोपे कधीचीच तयार झाली आहेत, पण पावसाने ओढ दिल्यामुळे, भातखाचरांमध्ये पुरेसे पाणी नसल्याने लागवडी रखडल्या आहेत. भाताच्या आतापर्यंत अवघ्या २८ टक्के लागवडी झाल्या आहेत.  विशेषतः  हळवा वाणाच्या भाताच्या लागवडी रखडल्या आहेत. पावसाची वाट बघून थकलेल्या काही शेतकऱ्यांनी, आता विहिरी, कुपनलिका, तळी इत्यादी मिळेल त्या उद्भवातून खाचरांमध्ये पाणी भरून लागवडी सुरू केल्या आहेत. ज्यांच्याकडे साधने नाहीत, ते पावसाची आतुरतेने पाहत आहेत.  

तालुक्यात ४५०० हेक्टरवर खरीप बटाटा लावला जातो. आतापर्यंत केवळ २४०० चोवीसशे एकरवर बटाटा लागवड झाली आहे. तालुक्याच्या मध्य भागामध्ये लागवडी झालेल्या दिसत आहेत. मात्र तालुक्याच्या पूर्व भागात, बहुतांश बटाटा लागवडी रखडल्या आहेत. पूर्व भागातल्या लोकांचे बटाटा हे मुख्य नगदी पीक असून, पाऊस नसल्याने ते हवालदिल झाले आहे. त्यातच बटाटा बियाणे महागल्याने बटाटा लागवडीऐवजी खरिपाच्या शेवटच्या टप्प्यात कांदा लागवड करण्याच्या पर्यायाचा विचार शेतकरी करीत आहेत. 

तालुक्यात पाऊस सरासरीपेक्षा जास्त दिसतोय. पण गेल्या महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे ही वाढ दिसून येत आहे. जुलै महिन्यात पावसाची सरासरी कमीच आहे. अनियमित पावसामुळे खरिपाच्या पेरण्या करण्यास लोक इच्छुक नसून दरवर्षी खरिपाचे क्षेत्र घटत चालले आहे. खरीप बाजरी मोडीत निघाली असून खरीप भुईमूग त्याच मार्गावर आहे. यावर्षी भुईमुगाच्या अवघ्या २३ टक्केच पेरण्या झाल्या असून यापुढे त्यात फारशी वाढ होणार नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com