

Baramati Police Gets New Officer After Departmental Transfers
sakal
बारामती : पोलिस निरिक्षक विलास नाळे यांच्या जागी वाहतूक विभागाचे पोलिस निरिक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांनी बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक म्हणून मंगळवारी सूत्रे स्विकारली. दरम्यान पोलिस निरिक्षक नीलेश माने यांची बारामती वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पाच पोलिस निरिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.