
अविनाश ढगे
पिंपरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वल्लभनगर आणि शिवजीनगर (वाकडेवाडी) आगारात बस ‘पार्किंग’साठी जागा नसल्याने पुणे-मुंबई महामार्गालगत त्या उभ्या केल्या जातात. मात्र, महामंडळाच्या मालकीच्या दोन जागा आळंदीत आहेत. त्यांचे क्षेत्र सुमारे सहा एकर असून त्यांवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. त्या विकसित केल्यास बस पार्किंगचा प्रश्न सुटेल, शिवाय राज्यातून येणाऱ्या भाविकांना थेट आळंदीपर्यंत प्रवास करता येईल. यामुळे महामंडळाचे उत्पन्न वाढू शकेल. पण, एसटी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.