पीएम किसान योजनेंतर्गत पीक कर्जासाठी विशेष मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

 ""पीएम किसान योजनेंतर्गत किसान कार्ड (पीक कर्ज) न घेतलेल्या शेतकऱ्यांना बॅंकिंग क्षेत्राकडून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे,'' अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

पुणे - ""पीएम किसान योजनेंतर्गत किसान कार्ड (पीक कर्ज) न घेतलेल्या शेतकऱ्यांना बॅंकिंग क्षेत्राकडून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे,'' अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने अर्ज दाखल करता यावा, यासाठी आयबीए संस्थेमार्फत एकपानी अर्जाचा नमुना बॅंकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्जासोबत शेतीचे उतारे आणि कर्ज नसल्याबाबतचे घोषणपत्र घेऊन "पीएम किसान' योजनेंतर्गत संबंधित बॅंकेत संपर्क साधावा. कोणत्याही बॅंक अथवा वित्तीय संस्थेमध्ये पीक कर्ज नसणाऱ्या "पीएम किसान' लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जप्रक्रिया शुल्क आणि निरीक्षण खर्च बॅंकांकडून माफ करण्यात येणार आहे. 

खासगी बसगाड्यांना पालिका लावणार ‘जॅमर’

केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. आवश्‍यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना बॅंकेमार्फत किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजनेंतर्गत पीककर्ज देण्यात येणार आहे. "पीएम किसान' योजनेंतर्गत अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था आणि बॅंकांकडून पीककर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांनी विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे. या संदर्भात तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांनी गावपातळीवर विशेष मोहीम राबवून शेतकरी आणि बॅंकांना सहकार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 

अठराशे बस; दोन लाख प्रवासी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special campaign for crop loan under PM Kisan Yojana