शिवाजीनगरमध्ये मतदानाचा वेग वाढला; चार तासात 10.15 टक्के मतदान

speed of voting increase in shivajinagar pune
speed of voting increase in shivajinagar pune

पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात संथ गतीने मतदान झाल्यानंतर नंतर वेग वाढला. सकाळी अकरापर्यंत 10.15 टक्के मतदान झाले. 

सकाळी पाऊस नसला तरी हवेत गारवा असल्याने अनेक  मतदार लवकर बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे शिवाजीनगर मतदारसंघात नागरिकांमध्ये निरुत्साह दिसून आला. सकाळी सात ते नऊ या वेळेत फक्त 3.74 टक्के मतदान झाले होते.

नऊ नंतर मतदानाचा वेग वाढला आहे. सकाळी अकरापर्यंत 10.15 टक्के मतदान झाले. विद्या भवन हायस्कूल, शिवाजी प्री मिलीटरी स्कूल, माॅडर्न महाविद्यालय, भारतीय विद्याभवन, लाल बहादुर शास्त्री विद्यालय यासह अनेक मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या आहेत. यामध्ये. महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण मतदानासाठी बाहेर  पडत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com