पुणे : तांत्रिक बिघाडामुळे स्पाइस जेटच्या विमानाचा उड्डाण रद्द; प्रवाशांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

पुणे : पुण्यावरुन दुबईला जाणारे स्पाइस जेटचे SG51 हे विमान रविवारी रात्री ११ वाजता उड्डाण करणार होते. मात्र, तांत्रिक खराबीमुळे या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. त्यामुळे १८० प्रवासी रात्रभर विमानतळावर अडकून पडले. 

पुणे : पुण्यावरुन दुबईला जाणारे स्पाइस जेटचे SG51 हे विमान रविवारी रात्री ११ वाजता उड्डाण करणार होते. मात्र, तांत्रिक खराबीमुळे या विमानाचे उड्डाण रद्द करण्याता आले. त्यामुळे १८० प्रवासी रात्रभर विमानतळावर अडकून पडले. प्रशासनाकडून प्रवाश्यांसाठी योग्य व्यवस्था न केल्याने प्रवाशांना विमानतळावर झोपून रात्र काढावी लागली.

स्पाइस जेटचे SG51 हे विमान रविवारी रात्री ११ वाजता पुणे विमानतळावरुन दुबईसाठी उड्डाण घेणार होते. मात्र तांत्रिक बिघाड झाल्याने या विमानाचे उड्डाण तब्बल १२ तास लांबले. त्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यांना रात्रभर विमानतळावर ताटकळत रहावे लागले. प्रवाशांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था न केल्याने त्यांना खाली झोपून रात्र काढावी लागली. या विमानाचे उड्डाण आज (सोमवारी) सकाळी साडेदहा वाजेपर्यंत झाले नव्हते. स्पाइस जेटच्या अधिकाऱ्यांकडून विमानाच्या उड्डाणाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, संतप्त प्रवाशांनी विमानतळावर घोषणा देत स्पाइस जेट प्रशासनाचा निषेध केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SpiceJet airline flight canceled due to technical failure