भारत बंदला रांजणगाव गणपती येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे आज भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तळेगाव ढमढेरे : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे आज भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सर्व व्यापारी मंडळांनी आपली दुकाने बंद ठेवून भारत बंदला पाठिंबा दर्शविला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज रांजणगाव गणपती येथे कृषी कायदा २०२० च्या विरोधात देशभरात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा  देण्यात आला असल्याची माहिती सरपंच सर्जेराव खेडकर यांनी दिली.  शेतकरी बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी शांततामय व लोकशाही मार्गाने बंद पुकारून गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला. 

दरम्यान, भारत बंदमुळे पुणे- अहमदनगर रस्त्यावर दररोज वाहणारी वाहने आज तुलनेने कमी प्रमाणात आढळून आली. रांजणगावातील अष्टविनायक महागणपती मंदिरात बंदचा परिणाम  म्हणून भाविकांची संख्या अल्प प्रमाणात आढळून आली. 

अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी ७ हजार विद्यार्थ्यांची सहमती

दरम्यान, तळेगाव ढमढेरे येथील बाजारपेठेत बंदला अल्प प्रतिसाद मिळाला असून, बहुतेक आर्थिक व्यवहार सुरळीत चालू असल्याचे दिसून आले . येथील दुय्यम निबंधक कार्यालयात व विविध बँकांमध्ये लोकांची गर्दी दिसून आली. मात्र येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा महात्मा फुले उपबाजार बंद असल्याने आवारात शुकशुकाट दिसत होता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spontaneous response to Bharat Bandla at Ranjangaon Ganpati