पुण्यात रिक्षाचालकांना उद्यापासून मिळणार अनुदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

auto riksha

पुण्यात रिक्षाचालकांना उद्यापासून अनुदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : रिक्षाचालकांना अनुदान देण्याचा तिढा अखेर सुटला असून, येत्या २२ मे पासून त्यासाठीची प्रक्रिया सुरू होणार आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि बारामतीमधील एकूण १ लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. दरम्यान, हे अनुदान मिळण्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारात गुरुवारी आंदोलन केले.

रिक्षाचालकांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने गेल्या महिन्यात घोषणा केली होती. त्यानुसार प्रत्येक रिक्षाचालकाला १५०० रुपये देण्यात येईल, असे म्हटले होते. परंतु, त्यासाठीची संगणक प्रणाली तयार झाली नव्हती. त्यामुळे हे अनुदान रखडले होते. या पार्श्वभूमीवर आता शनिवारपासून अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी आयसीआयसीआय बॅंकेने प्रणाली तयारी केली आहे. राज्यात ७ लाख २२ हजार रिक्षाचालकांना अनुदान देण्यात येणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात या कामासाठी ४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना शुक्रवारी दुपारी एकला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी तीनला रिक्षाचालक संघटनांच्या प्रतिनिधींना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येईल. शनिवार- रविवारही हे काम सुरू राहणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.

हेही वाचा: पुणेकरांनी पहिल्या डोसला केंद्रांवर केली गर्दी

पुणे शहरात ७२ हजार, पिंपरी चिंचवडमध्ये २० हजार आणि बारामतीमध्ये सुमारे २ हजार पात्र रिक्षाचालक आहेत. अन्य सहा हजार घटक आहेत, असेही त्यांनी सांगितले.खासदार बापट यांनी आरटीओ कार्यालयात गुरुवारी दुपारी ठिय्या आंदोलन केले. लवकर पैसे रिक्षा चालकांच्या खात्यात जमा करावेत, असे निवेदन आरटीओ शिंदे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी नगरसेवक उमेश गायकवाड, रिक्षा संघटनेचे बाबा कांबळे, बापू भावे, बादशहा सैयद, माजी नगरसेवक उज्वल केसकर, पुणे शहर भाजपचे उपाध्यक्ष स्वरदा बापट तसेच पुष्कर तुळजापूरकर, सतीश मोहोळ आदी उपस्थित होते.

हेही वाचा: पुण्यातील ‘खेडेकर’मध्येही होणार आता बुरशीवर उपचार

असे मिळणार अनुदान

१) वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक आणि आधार क्रमांकाची माहिती रिक्षाचालकांनी संगणक प्रणालीवर ऑनलान

भरायची आहे.

२) माहितीची पडताळणी झाल्यावर रिक्षाचालकाच्या खात्यात १५०० रुपये अनुदान जमा होईल.

३) तत्पूर्वी रिक्षाचालकाचा आधार कार्ड क्रमांक आणि बॅंक खाते लिंक होणे गरजेचे आहे.

४) कोठेही कागदपत्रे जमा करायची गरज नाही, असे आरटीओने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: लॉकडाउमुळे आर्थिक ताणाताण वाढल्याने शेतकरी वळला पीककर्जाकडे

loading image
go to top