

SPPU Issues Advisory After Leopard Rumours Circulate on Social Media
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या संदर्भातील अफवांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन केले आहे. विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने वन विभागाशी संपर्क साधून योग्य त्या उपाययोजना करण्याच्यादृष्टीने पावले उचलली असून विद्यापीठाच्या आवारात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या आवारात बिबट्याचा वावर असल्याची अफवा पसरली होती. त्यावर वन विभागाशी संपर्क साधून या माहितीची पडताळणी करण्यात आली आहे.