esakal | विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा अर्ज भरण्याबाबत पुणे विद्यापीठाने केली महत्त्वाची घोषणा!
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-University

विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांनी याबाबत आपल्या विद्यार्थ्यांना अवगत करावे. 

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा अर्ज भरण्याबाबत पुणे विद्यापीठाने केली महत्त्वाची घोषणा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व परीक्षांचे अर्ज भरण्यास स्थगिती दिली आहे. परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक डाॅ. महेश काकडे यांनी ही माहिती दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यापीठांच्या परीक्षांसंदर्भात यूजीसीकडून प्राप्त झालेली मार्गदर्शक तत्वे, तसेच महाराष्ट्र शासनाकडून सूचना याबाबत येणार आहेत. त्यानुसार परीक्षांचे स्वरूप ठरणार आहे. 

- खबरदार! कोरोना मृतांवरील अंत्यसंस्काराला विरोध कराल तर...!

या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित केली आहे. पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना याबाबत माहिती कळविण्यात येईल.

- लॉकडाउनमुळे पडलाय बेरोजगारीचा 'टॉप गिअर'; भारतातील बेरोजगारीचा दर पोहोचला...!

विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांनी याबाबत आपल्या विद्यार्थ्यांना अवगत करावे, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत, असे काकडे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

loading image
go to top