
पुणे : अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी अवकाशात केलेल्या प्रयोगांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) भौतिकशास्त्र विभागाचे संशोधन आधारभूत ठरले आहे. विभागातील जैवभौतिकी प्रयोगशाळेत २००४ पासून डॉ. पंडित विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या परिणामांचे अध्ययन केले जात आहे. त्यांचे हेच संशोधन धारवाडच्या कृषी संशोधन संस्था आणि आयआयटीने आधारभूत मानले, ज्याद्वारे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात प्रयोगांची निश्चिती करण्यात आली होती.