अधिकाऱ्यांच्या दालनांत पालिकेकडून फवारणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

पुणे - महापालिकेत झुरळ आणि उंदरांचा सुळसुळाट झाल्याने प्रशासनाकडून सलग दोन दिवसांच्या सुटीचे निमित्त साधून पदाधिकाऱ्यांच्या दालनांत औषध फवारणी करण्यात आली. 

पुणे - महापालिकेत झुरळ आणि उंदरांचा सुळसुळाट झाल्याने प्रशासनाकडून सलग दोन दिवसांच्या सुटीचे निमित्त साधून पदाधिकाऱ्यांच्या दालनांत औषध फवारणी करण्यात आली. 

मंत्रालयातील उंदीर मारण्याच्या विषयावरील चर्चा थंड झाली आहे. मात्र आता पुणे महापालिकेत उंदीर आणि झुरळांचा सुळसुळाट झाला आहे. विशेष करून पदाधिकाऱ्यांच्या दालनांत हे प्रमाण वाढले आहे. पदाधिकाऱ्यांच्या दालनांत "फॉल सीलिंग' बसविले गेले आहे. त्यामध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविली आहे. या वातानुकूलित यंत्रणेत उंदीर जाउन बसतात. त्यामुळे ती यंत्रणा बंद पडल्याचे प्रकार घडले आहेत. महापौर कार्यालयातील वातानुकूलित यंत्रणा काही दिवसांपूर्वी बंद पडली होती. स्थायी समिती बैठकीसाठी येणाऱ्या सदस्य आणि अधिकाऱ्यांकरिता भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली असते. इतर वेळी पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयातही दुपारचे जेवण होत असते. शिल्लक अन्नामुळे झुरळांची संख्या वाढीस लागली आहे. 

महापालिकेच्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर नगर सचिव विभाग आणि पदाधिकाऱ्यांची दालने आहेत. या दालनांच्या साफसफाईचे काम नगर सचिव कार्यालयांतर्गत होते. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेते, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे आणि शिवसेना यांची कार्यालयेही आहेत. या ठिकाणी उंदीर आणि झुरळांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने औषध फवारणीचे काम शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस केले. 

Web Title: spray in pmc officers room