खेड तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येचा विक्रम, लॉकडाउनबाबत घेतलाय हा निर्णय

corona1
corona1

राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण गेल्या आठवड्यात लक्षणीयरित्या वाढले असून, कोरोनाचा कहर झाला आहे. आज एक दिवसात तब्बल २२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्ण संख्येने द्विशतक गाठले आहे. एकूण संख्या २१६ झाली आहे. गेल्या ७ दिवसात कोरोनाबाधितांची संख्या ११३ ने वाढली असून ती दुप्पट झाली आहे. 

खेड तालुक्यातील राजगुरूनगर, चाकण  व आळंदी या शहरांमध्ये कोरोनाबाधित वाढत चालल्याने चिंता वाढली आहे. पुणे कनेक्शनमधून खेड तालुक्यात रुग्ण आढळत आहेत. आज राजगुरूनगरला ७ आणि आळंदीला ४ रुग्ण आढळले आहेत. चिंबळी आणि मोईला प्रत्येकी २ जण पॉझिटिव्ह आले. तर, रासे, सोळू, काळूस, चिंचोशी, आखरवाडी, कडधे, चांडोली येथे प्रत्येकी एकजण कोरोनाबधित आढळला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा फैलाव सुरु झाला तरी खेड तालुका पहिल्या अडीच महिन्यात कोरोनामुक्त होता. पण, १५ मे रोजी पहिला रुग्ण सापडला आणि  रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. जून महिन्यात पुणे कनेक्शनमधून आणि विशेषतः कंपनी संपर्कातून रुग्ण वाढू लागले. प्रथम १५ मे रोजी १ रुग्ण असलेल्या तालुक्यात १८ जून रोजी ५१ कोरोनाबाधित झाले होते. तर, २९ जून रोजी, रुग्णसंख्या १०३ वर आणि ३ जुलै रोजी १५१ वर गेली. आज ( ६ जुलै ) २१६ रुग्ण झाले आहेत.

दरम्यान, राजगुरूनगर सहकारी बँकेच्या पाईट आणि टिळक चौक ( राजगुरूनगर ) या दोन शाखांमध्ये मिळून आज नऊ जण पॉझिटिव्ह आढळल्याने गावात चिंताजनक वातावरण आहे. या दोन्ही शाखांचे कामकाज सध्या बंद असून ग्राहकांनी अत्यावश्यक आर्थिक गरजेसाठी बँकेच्या इतर शाखांमध्ये संपर्क करावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष गणेश थिगळे यांनी केले आहे. 

राजगुरुनगरमध्ये लॉकडाउन                                                                   रुग्णसंख्या खूपच वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच खेड तालुका लॉकडाउन करण्याची मागणी होत होती. परंतु प्रशासनाकडून तसे सरसकट आदेश देण्यात आले नाहीत. मात्र, राजगुरुनगरमध्ये ६ जुलै ते १३ जुलै, असा आठ दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आल्याचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुचित्रा आमले यांनी जाहीर केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com