Pune : SRA प्राधिकरण आणि मनपाकडून झोपडपट्टीधारकांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : SRA प्राधिकरण आणि मनपाकडून झोपडपट्टीधारकांवर कारवाई

Pune : SRA प्राधिकरण आणि मनपाकडून झोपडपट्टीधारकांवर कारवाई

पुणे : महामेट्रो आणि पीएमआरडीएच्या मेट्रो मार्गाच्या स्टेशनसाठी आवश्‍यक असलेली जागा शिवाजीनगर येथील कामगार पुतळा झोपडपट्टीधारकांना वारंवार सांगूनही खाली न केल्यामुळे गुरूवारी झोपडीधारकांवर एसआरए प्राधिकरण आणि महापालिकेकडून कारवाई केली. या झोपडपट्टीतील सुमारे ७०० पात्र झोपडीधारकांचे यापूर्वीच हडपसर आणि विमाननगर येथे पुनर्वसन केले आहे. उर्वरीत तीनशे झोपडीधारकांना सदनिकांचे वाटप करण्यात आले होते. मात्र ते न गेल्याने आज त्यांच्यावर कारवाई केल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: Zomatoची सर्व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून माघार, वाचा कारण!

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम महामेट्रोकडून हाती घेण्यात आले. तर हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआडीएकडून हाती घेण्यात आले.हे दोन्ही मेट्रो मार्ग शिवाजीनगर येथील कामगार पुतळा झोपडपट्टीच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्टेशनमध्ये एकत्र येऊन मिळणार आहेत. महामेट्रोची मेट्रो या स्टेशनपासून स्वारगेटकडे, तर पीएमआरडीएची मेट्रो खराडीकडे जाणार आहे. त्याठिकाणी सुमारे १२६४ झोपड्या आहेत. त्यांचे विमाननगर आणि हडपसर येथील पुनर्वसन प्रकल्पातील गाळ्यांमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी एसआरए प्राधिकरणाकडून तेथील झोपडीधारकांसाठी ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात ८७४ गाळे धारकांना गाळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यापैकी ७०० झोपडीधारकांचे स्थलांतर करून पुनर्वसन करण्यात आले. तर पात्र २०० आणि अपात्र ५०० झोपडीधारकांनी अद्याप स्थलांतर केले नाही. दरम्यान कोरोना काळात कोणत्याही झोपडीधारकांवर कारवाई करण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले होते. हे आदेश मध्यंतरी न्यायालयाकडून उठविण्यात आले. त्यामुळे कामगार पुतळा आणि राजीव गांधी नगर येथील पात्र आणि अपात्र असा स्थलांतर न केलेल्या झोपडीधारकांना रेल कापेोरेशनने जाहीर नोटीस काढून स्थलांतर करण्याचे वारंवार आवाहन केले होते. जे झोपडीधारक स्थलांतर करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही दिला.

हेही वाचा: T20 WC PAKvsAUS Live : झम्पानं पाकिस्तानला दिला पहिला धक्का

दिवाळीपूर्वी ही कारवाई करण्यात येणार होती. पुन्हा झोपडीधारकांना एक संधी देण्यात आली. आज अखेर महापालिका, एसआरए आणि महामेट्रो यांच्याकडून पोलिसांच्या मदतीने या झोपडीधारकांवर कारवाई करण्यात आली. किरकोळ विरोध वगळता ही कारवाई शांततेत पार पडली. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

"मेट्रो स्टेशनसाठी ही जागा महामेट्रोला देण्यात आली आहे. या झोपडपट्टीतील सातशे गाळेधारकांचे पुनर्वसन यापूर्वीच करण्यात आले आहे. उर्वरित १७५ गाळेधारकांना सदनिकांचे वाटप झाले आहे. रजिस्ट्रेशन देखील झाले आहे. मात्र त्यांनी स्थलांतर केले नव्हते ते आणि उर्वरित १२५ गाळेधारकांना गाळे वाटप झाले आहे. त्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलेले नाही. वारंवार सांगूनही त्यांनी जागा न सोडल्यामुळे ही कारवाई करण्यात आली."

- राजेंद्र निबांळकर, मुख्याधिकारी, एसआरए प्राधिकरण

"महामेट्रो आणि एसआरए यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. महापालिकेने केवळ कारवाईसाठी यंत्रणा आणि कर्मचारी वर्ग पुरविला आहे. तेथील झोपडीधारकांचे यापूर्वीच पुनर्वसन एसआरएकडून करण्यात आले आहे."

- माधव जगताप, अतिक्रमण विभाग प्रमुख, महापालिका

loading image
go to top