
"Flood victims in Sangvi receive relief from Sri Ayyappa Swami Temple Committee — ₹1.51 lakh contributed to Morning Relief Fund."
Sakal
-रमेश मोरे
जुनी सांगवी : जयमालानगर येथील श्री अय्यप्पा स्वामी सेवा परिषद, अय्यप्पा मंदिर समिती व पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या केरळीय समाज बांधवांकडून पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश मदत निधी म्हणून देण्यात आला आहे. ‘सकाळ’चे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर महेंद्र पिसाळ, कम्युनिटी डेव्हलपमेंटचे सरव्यवस्थापक प्रदिप वेदपाठक यांनी तो स्वीकारला.