

Recruitment Exam Shock: SRPF Paper Sparks Allegations of Irregularities
sakal
सोमेश्वरनगर: राज्य राखीव पोलिस बलाच्या (गट ५, दौंड) शिपाई पदासाठी झालेल्या लेखी परीक्षेत एका खासगी प्रकाशनाच्या सराव संचातून तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे विचारल्याने खळबळ उडाली. प्रश्नांची क्रमवारी व पर्यायांतही बदल नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.