SRPF Women Recruitment : 'एसआरपीएफ'मध्ये महिलांची भरती कधी? सहा वर्षांनंतरही घोषणा कागदावरच; उमेदवारांचा सरकारला सवाल

एसआरपीएफमध्ये महिलांसाठी स्वतंत्र बटालियन स्थापन करण्याच्या घोषणेला सहा वर्षे पूर्ण झाली, तरी भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. आगामी पोलिस भरतीत महिला बटालियनचा समावेश करून पात्रता व परीक्षेचा आराखडा तातडीने जाहीर करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.
women police recruitment

SRPF women recruitment delayed for six years candidates demand inclusion in upcoming Maharashtra Police recruitment

esakal
Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : राज्य राखीव पोलिस दलात (एसआरपीएफ) महिलांसाठी स्वतंत्र बटालियन स्थापन करण्याच्या ऐतिहासिक घोषणेला तब्बल सहा वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, अद्याप एकाही महिला पोलिसाची या दलात भरती झालेली नाही. नागपूरमधील काटोल येथे पहिली महिला बटालियन स्थापन करण्याच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी मिळूनही, प्रत्यक्षात भरती प्रक्रिया कागदावरच अडकली आहे. त्यामुळे राज्यभरातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो महिला उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण असून, आगामी भरतीत तरी या पदांची भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनींनी उपस्थित केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com