राजगुरुनगर - येथील महात्मा गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी कनुप्रिया सांडभोर हिने दहावीला १०० टक्के गुण मिळवून उच्चांक केला आहे. खासगी शिकवणी न लावता आणि रोज केवळ तीन ते चार तास अभ्यास करून तिने हे यश संपादन केले..कनुप्रिया टेल्को कॉलनी क्रमांक २ मध्ये राहते. बुद्धीने तल्लख असलेली कनुप्रिया लहानपणापासूनच शिक्षणात अग्रेसर राहिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत २०२० साली कनुप्रियाने तालुक्यात पहिला, जिल्ह्यात दुसरा, तर राज्यात चौथा क्रमांक पटकाविला होता. तसेच ती नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी पात्र झाली होती. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही ती राज्यात १३ वी आली होती. वर्गात पहिला क्रमांक तर ठरलेलाच असायचा..‘अभ्यासात तिला आमची फारशी गरज लागली नाही, मात्र तिला आजारी पडू द्यायचे नाही, अशी ठरवून आम्ही तिची काळजी घेतली, असे वडील संदीप सांडभोर यांनी सांगितले. पहिलीपासून दहावीपर्यंत कधीही खासगी शिकवणी लावली नाही.ती स्वतः अभ्यास करायची आणि पाठांतरापेक्षा संकल्पना समजावून घेण्यावर तिचा भर असायचा. मी तिच्या अभ्यासाचा आढावा घ्यायचे. पण, तिच्या वेळापत्रकात हस्तक्षेप केला नाही,’ असे तिची आई आम्रपाली सांडभोर यांनी सांगितले..‘कनुप्रिया अभ्यासाबरोबरच खेळातही प्रवीण आहे. तिला तलवारबाजीमध्ये राज्यस्तरीय कांस्यपदक मिळालेले आहे. ती तायक्वांदो खेळते. तसेच ‘सेपाक टकरा’ नावाचा खेळ खेळते. ती एनसीसी कॉर्पल आहे. चित्रकलेची इंटरमिजिएट परीक्षा ती ‘ए’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण आहे.तिचे वक्तृत्व उत्तम असून मराठी शाळेतील सेमी इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी असूनही ती इंग्रजी भाषेत वक्तृत्व करते. एकाच वेळी कला, क्रीडा आणि शिक्षणात चमकणारी असाधारण प्रतिभेची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे,’ असे तिचे वडील संदीप सांडभोर यांनी सांगितले..‘विज्ञान शाखेतून शिक्षण घेऊन संगणक अभियंता करण्याची माझी इच्छा आहे. निकाल लागायच्या आधी ९७ ते ९८ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळतील असे वाटत होते, पण शंभर टक्के मिळतील, असे वाटले नव्हते. जेव्हा १०० टक्के गुण पडल्याचे समजले, तेव्हा खूप आनंद झाला. सर्व कुटुंबीय, दहावीपर्यंत मार्गदर्शन केलेले शिक्षक व सर्व मित्र-मैत्रिणी यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याबद्दल खूप आनंद झाला.मला या संपूर्ण प्रवासामध्ये मार्गदर्शन केलेल्या विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानावे वाटतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला कधीही खासगी शिकवणी लावायची गरज भासली नाही. त्यांनी खरोखर मला स्व-अध्ययन कसे करावे याबद्दल शिकवले. याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छिते,’ असे कनुप्रिया म्हणाली..क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर भर द्यावाफक्त पुस्तकी ज्ञान किंवा अभ्यासावरती भर न देता इतरही विविध उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा. त्यामुळे ताणतणावाचे योग्य प्रकारे नियोजन करता येते. स्वअध्ययनावर लक्ष देऊन पाठ्यपुस्तकांतून अभ्यास करण्यावर जास्त भर द्यावा. स्वतःच्या नोट्स स्वतः तयार कराव्यात. बरोबर आलेल्या गोष्टींपेक्षा चुका शोधून सुधारण्यावर भर द्यावा. अभ्यासाच्या वेळेच्या बाबतीत क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर भर द्यावा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.