दहावी-बारावी परीक्षेसाठी अर्ज मुदतीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

पुणे - दहावी आणि बारावीची परीक्षा खासगीरीत्या देणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह विभागीय मंडळाकडे ऑफलाइन पद्धतीने नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी १५ ते ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

पुणे - दहावी आणि बारावीची परीक्षा खासगीरीत्या देणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह विभागीय मंडळाकडे ऑफलाइन पद्धतीने नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी १५ ते ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरणाऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याबाबत सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ‘http://form१७.mh-ssc.ac.in’ आणि ‘http://form१७.mh-hsc.ac.in’ या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: SSC HSC Exam Form