"एसटी'मध्ये हद्दीचे वाद कशासाठी? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

पिंपरी - ""एसटी महामंडळामधील चालकांवर अधिकाऱ्यांच्या कृतीचा मोठा ताण असतो. अनेक ताण अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमुळे येतात. महामंडळातील अधिकाऱ्यांची भूमिका कर्मचाऱ्यांसाठी कुटुंबप्रमुखाप्रमाणे असली पाहिजे. तितकीच निर्णायकही असली पाहिजे. चालक-वाहक पर्यायाने प्रवाशांच्या हितामध्ये एसटी स्थानकांमध्ये पोलिसांप्रमाणे हद्दीचे वाद कशासाठी?'' असे अनेक प्रश्‍न निर्माण करत परिवहन मंत्री तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी अप्रत्यक्षरीत्या आपल्या अधिकारी वर्गाला कानपिचक्‍या दिल्या. 

"एसटी महामंडळ' आणि केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेतर्फे (सीआयआरटी) एसटी चालकांसाठी तीन दिवसीय सपत्नीक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‌घाटनप्रसंगी रावते बोलत होते. एसटी चालक व त्यांच्या पत्नींच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून उद्‌घाटन झाले. महामंडळाचे पुणे विभाग महाव्यवस्थापक सूर्यकांत अंबाडेकर, प्रशिक्षण विभागाचे उपमहाव्यवस्थापक बी. एम. जाधव, "सीआयआरटी'चे प्रशिक्षण व सल्लागार विभागप्रमुख आशिष मिश्रा, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील व्यासपीठावर होते. 

रावते म्हणाले, ""महामंडळातील प्रत्येक कामगाराचा सन्मान व्हावा. त्यांचे अस्तित्व सन्मानित व्हावे, असे प्रशासन निर्माण होणे आवश्‍यक आहे. त्यातही "यांत्रिकी विभाग' आणि "चालक' हा या यंत्रणेतील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. मात्र, चालकांवर अनेक प्रकारचे ताण असतात. त्यांच्यासमोर अनेक अडचणी असतात. अधिकारी वर्गाकडून या अडचणींचा भावनिकदृष्ट्या विचार होणे गरजेचे आहे. त्यांच्यावर विश्‍वास ठेवला गेला पाहिजे. त्या पार्श्‍वभूमीवरच हे प्रशिक्षण केवळ चालकांसाठी नाही, तर अधिकाऱ्यांचेही आहे. कर्मचाऱ्यांकडे कशा दृष्टीने पाहावे, याची जाणीव करून देणारे हे प्रशिक्षण आहे. अधिकाऱ्यांनी कुटुंब प्रमुखाची भूमिका वठविल्यास नकळतपणे प्रशासन सुधारेल. एसटीचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे सामर्थ्य कर्मचाऱ्यांमध्ये आहे. प्रशिक्षणामुळे चांगला चालक घडविण्याचे समाधान मिळणार आहे. महामंडळाच्या इतिहासात एसटी चालकांचे पहिलेच प्रशिक्षण सपत्नीक होत आहे. त्यामागे अनेक भावनिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टिकोन आहे. अशा प्रकारच्या प्रशिक्षणांमधून आपण चांगल्या प्रकारचे प्रशासन निर्माण करू. भविष्यात एसटीत निश्‍चित आमूलाग्र बदल घडतील.'' 
आयडीटीआर प्रमुख के. माधवराज यांनी स्वागत केले. एम. एम. मोघे यांनी प्रास्ताविक केले. एस. आर. भोसले यांनी आभार मानले. 

Web Title: ST border disputes